
केज प्रतिनिधी
नरेंद्रजी मोदी परिचारिका प्रशिक्षण संस्था केज येथे जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम व फ्लोरोसिस प्रतिबंध कार्यक्रम जिल्हा रुग्णालय बीड अंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.त्यात मार्गदर्शक मानसोपचार तज्ञ डॉ. अशोक मते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सध्या मोठ्या प्रमाणात आरोग्यावर मानसिक ताण तणावाचा परिणाम होत आहे.
मोठ्या प्रमाणात तरुण पिढी व विद्यार्थी या परिणामाला सामोरे जात आहेत चिडचिड करणे,राग अनावर होणे, एकलकोंडेपणा, नकारात्मकता,विद्यार्थ्यांच्या वर्तनात बदल अशा अनेक आजारांना विद्यार्थी व तरुण पिढी बळी पडत आहे तेव्हा या आजाराला बळी न पडता खालील त्रिसूत्रीचा वापर करा.
म्हणजेच दुसऱ्या बरोबर तुलना करू नका,दुसऱ्याबरोबर स्पर्धा करणे सोडा, तसेच सतत हे नाही ते नाही म्हणून रडत बसू नका असे सांगत जीवनात पंचसूत्रीचा वापर करा जीवन सुंदर होईल ते म्हणजे सकारात्मकता, एकलकोंडेपणा सोडा व्यक्त व्हा,नवीन शिका तसेच वर्तमानात जगायला शिका भूतकाळात हे होतं. भविष्यकाळात हे असेल याचा विचार सोडा तर जीवनात ध्यान धारणेला महत्त्व द्या म्हणजे जीवन जगणे सुंदर होईल असे सांगितले तर अध्यक्ष पदावरून संस्थाध्यक्ष अॕड. उद्धवराव कराड यांनी आरोग्यम् धन संपदा असे म्हणत आरोग्य असेल तर सर्व जग आहे त्यातच मानसिक आरोग्य महत्त्वाचे आहे मन सुंदर तर जग सुंदर म्हणून मानसिक आरोग्य महत्त्वाचे आहे.
मन कमकुवत ,कमजोर , कुपोषित असेल तर मानसिक आरोग्य बिघडते तेव्हा मन तंदुरुस्त ठेवा मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण म्हणतअध्यक्षीय समारोप केला.यावेळी श्री.अविनाश महालिंगे सरांनी फ्लोरोसिस म्हणजे कायॽ फ्लोरोसिस होण्या मागील कारणे व त्या वरील उपाययोजना याबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.अंबादास जाधव सर यांनी केले तर सूत्र संचालन मा.नरेंद्रजी मोदी परिचारिका प्रशिक्षण संस्थेचेप्राचार्य नेहरकर सर यांनी केले.
कार्यक्रमाला सानेगुरुजी निवासी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. कविता गिते-कराड मॅडम,केदार सर, प्रियंका भोंडवे मॅडम,चिरके मॅडम व जी एन एम चे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नेहरकर सर यांनी केले.



