विद्यार्थ्यांनी शिक्षणा बरोबरच खेळातही प्राविण्य मिळवावे -आ.नमिता मुंदडा

केज/प्रतिनिधी
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी तथा जिल्हा क्रीडा परिषद,बीड आणि केज तालुका क्रीडा कार्यालय केज आयोजित तालुका स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा केज येथील साने गुरुजी निवासी विद्यालयाच्या क्रीडा मैदानावर आयोजित करण्यात आल्या आहेत सन 2025-26 मध्ये आयोजित केलेल्या तालुकास्तरीय शालेय खो-खो क्रीडा स्पर्धेचे केज विधानसभा मतदार संघाच्या विद्यमान आमदार सौ.नमिता मुंदडा यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले
यावेळी आमदार नमिता मुंदडा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की,शिक्षणा बरोबरच खेळांकडे सुध्दा विद्यार्थ्यांनी लक्ष देउन प्राविण्य मिळवले पाहिजे.यामुळे आपल्या भविष्यात याचा फायदा नक्की होतो.मला सुद्धा खेळाची आवड आहे मी सुद्धा लॉन टेनिस खेळत होते. खेळामुळेच मला पाहिजे त्याकॉलेज मध्ये प्रवेश मिळाला होता.अभ्यासा बरोबर खेळ सुद्धा महत्वाचा आहे.यामुळे आरोग्य सुद्धा सुधारते त्यामुळे खेळ जीवनात आवश्यक आहे.तालुका स्तरीय खो खो स्पर्धेत केज तालुक्यातील एकुण 22 मुलींच्या संघाने सहभाग नोंदवून उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.
कार्यक्रमाचेअध्यक्ष साने गुरुजी निवासी विद्यालय केजच्या प्राचार्य डॉ.श्रीमती कविता कराड-गित्ते मॅडम व प्रमुख उपस्थिती तालुका क्रीडा अधिकारी श्रीमती राखी यादव मॅडम त्याच बरोबर विनोद गुंड,भगवान केदार, डॉ. वासुदेव नेहरकर, सुनिल आबा गलांडे,सुदाम पाटील, शरद इंगळे,सुनिल घोळवे,विष्णू थोरात, खदिर कुरेशी,महादेव जाधवर, अरुण शेप, रामदास सानप,बर्डे सर,नागरगोजे सर, नेहरकर सर,संजय इंगळे सर,श्रीमती दिपाली कांदे व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती डोंगरे मॅडम व कार्यक्रमाचे व मान्यवरांचे आभार तरकसे सर यांनी केले.



