केज शिवसेना उबाठा टोलनाका संदर्भात रास्तारोको आंदोलन करणार -तालुकाप्रमुख अशोक जाधव

केज/प्रतिनिधी
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उमरी केज टोलनाका संदर्भात केज तहसील येथे निवेदन देण्यात आले. निवेदनात टोलनाका येथे अपुऱ्या सुविधा असताना अवैध टोल वसुली सुरू आहे. सदरिल टोलनाका येथिल कर्मचारी वाहन धारकांनाअर्वाच्छ,उद्धट व दादागिरीची भाषा वापरत आहेत,महिलां साठी स्वच्छतागृह नाही टोलची संगणकीय प्रक्रिया खुप हळू गतीने असते त्यामुळे अनेक वाहनधारकांना बराच वेळ टोलनाक्यावरच थांबावे लागते.
यासंदर्भात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख अशोक जाधव यांनी केज तहसीलदार यांना टोलनाका संदर्भात कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता टोल नाक्यावरिल शंभर टक्के शासनाच्या नियमांचे व अटीचे पालन होईपर्यंत सदरील टोलनाका बंद करण्यात यावा नसता केज शिवसेनेच्या वतीने तहसील समोर दि.२९ सप्टेंबर रोजी तीव्र स्वरूपाचे रास्तारोको आंदोलन करण्यात येईल असा ईशारा तालुकाप्रमुख अशोक जाधव,शहरप्रमुख तात्या रोडे,उपतालुका प्रमुख तानाजी धस, मारूती गव्हाणे,पप्पू कोल्हे,किशोर घुले, सुधिर जाधव आदिंनी दिला आहे.



