विद्यार्थ्यांनी स्वतःच्या क्षमता विकसित करणे आवश्यक आहे- जी.बी. गदळे स्वामी विवेकानंद शाळेतील विद्यार्थ्यांचा स्क्रीनिंग टेस्टमध्ये निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार संपन्न

केज/प्रतिनिधी
जीवन विकास शिक्षण मंडळ केज संचलित, स्वामी विवेकानंद विद्यामंदिर [माध्यमिक विभाग ] केज या शाळेमध्ये लातूर येथील राजर्षी शाहू महाविद्यालय तसेच संत तुकाराम महाविद्यालय स्क्रीनिंग टेस्ट द्वारे निवड झालेल्या एकूण सात विद्यार्थ्यांचा पालकासह सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचेउपाध्यक्ष नईमोद्दीन इनामदार, सचिव जी.बी.गदळे तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका शिवनंदा मुळे हे उपस्थित होते.
याप्रसंगी राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर स्क्रीनिंग टेस्टमध्ये निवड झालेले विद्यार्थी श्रावण रामदास चाटे,आकांक्षा दीपक सांजुरे,प्रज्ञा दिनकर घुले,श्रेयश रघुनाथ बनसोडे तर संत तुकाराम महाविद्यालय स्क्रीनिंग टेस्टमध्ये- सई बालाजी साखरे,ज्ञानदा सुनील गायकवाड,आयुष जयप्रकाश सातपुते या विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना संस्थेचे सचिव जी.बी. गदळे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी भविष्यातील अशा विविध परीक्षांना सामोरे जाण्यासाठी व या स्पर्धेमध्ये टिकून राहण्या साठी स्वतःच्या क्षमता विकसित केल्या पाहिजेत.वरील विद्यार्थ्यांच्या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष अंकुशरावजी इंगळे, सहसचिव तथा मुख्याध्यापक उपेंद्र कोकीळ,कोषाध्यक्ष फजीलोद्दीन काझी, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा शैलाताई इंगळे,प्राचार्य भैरट सर,प्राथमिक विभागाचे मु.अ.वसंत शितोळे,स्वयंअर्थ शाळेचे मु.अ.संघपाल मस्के, स्वयंअर्थ शा.व्य.स. अध्यक्ष नारायणराव अंधारे तसेच शाळेतील सर्व शिक्षकवृंद यांनी अभिनंदन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रबोधकांत समुद्रे यांनी केले.तर आभार कल्याण आदमाने यांनी मानले.



