महंत श्री.महादेव महाराज बोराडे शास्त्री यांचा “जगद्गुरू सेवा भूषण” पुरस्काराने गौरव

केज/प्रतिनिधी
रामानंद मिशन ट्रस्ट, पुणे यांच्या वतीने प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा “जगद्गुरू सेवा भूषण पुरस्कार” यावर्षी केज तालुक्यातील श्रीक्षेत्र संत तुकोबाराय पावनधाम संस्थानचे संस्थापक अध्यक्ष महंत ह.भ.प.श्री.महादेव महाराज बोराडे शास्त्री यांना प्रदान करण्यात आला.हा पुरस्कार सोहळा पुणे येथे अत्यंत उत्साहात व आध्यात्मिक वातावरणात पारपडला.
श्री.ह.भ.प.भावार्थ महाराज देखणे विश्वस्त श्री.संतज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती,श्रीक्षेत्र आळंदी यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार महंत ह.भ.प.श्री.महादेव महाराज बोराडे शास्त्री यांना प्रदान करण्यात आला.समाजप्रबोधन, संतवाङ्मय प्रचार-प्रसार, अध्यात्म व सेवाभावी कार्यातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन हापुरस्कार देण्यात आला असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या सोहळ्याला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. त्यामध्ये श्री.पं.विशालजी कशाळकर गुरूजी, श्री.पं. रघुनाथजी खंडाळकर ,नगरसेवक श्री.युवराज बेलदरे, श्री.आर.के.रांजणे, प्रा.सचिनजी डिंबळे, प्रा.गणेश महाराज भगत,श्री.प्रशांत निगडे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी महादेव महाराजांच्यासमाजसेवा,अध्यात्मिक कार्यआणि गुरुकुल परंपरेतील सातत्यपूर्ण योगदानाचे कौतुक केले.



