होळ येथे माजी विशेष पोलिस महानिरीक्षक अंकुशराव शिंदे यांचा सेवापूर्ती निमित्त गौरव
जंगी मिरवणूक काढून नागरी सत्कार; माजी मुख्य न्यायमूर्ती संभाजीराव शिंदे यांची विशेष उपस्थिती

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील होळचे सुपुत्र,राज्याच्या व्ही आय पी सुरक्षा विभागाचे माजी विशेष पोलिस महानिरीक्षक अंकुशराव शिंदे हे नुकतेच सेवानिवृत्त झाले.त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी सेवापूर्ती सन्मान सोहळ्याचे आयोजन रविवारी दि.१७ आॕगष्ट रोजी सकाळी ११ वाजता होळ येथील हनुमान मंदिरात करण्यात आले.या सोहळ्यापूर्वीग्रामस्थांनी जंगी मिरवणूक काढून त्यांचे उस्फूर्त स्वागत केले.

कार्यक्रमाला राजस्थान चे माजी मुख्यन्यायमूर्ती संभाजीराव शिंदे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.सोहळ्याचे अध्यक्षस्थान सरपंच अश्विनीताई शिंदे यांनी भूषविले. प्रमुख अतिथी मध्ये मांजरा साखर कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक दत्ता शिंदे,माजीसरकारी वकील अॅड.प्रकाश शिंदे , पुणे सीआयडीचे माजी पोलीस उप अधीक्षक दीपक शिंदे, केंद्रप्रमुख रमेशकांबळे, माजीप्राचार्य डॉ.ज्ञानोबा सरवदे, बारामती अॅग्रोचे प्रबंधक अंकुश ढवारे, मुख्याध्यापक धर्मराज शिंदे,हृदयरोगतज्ज्ञ डॉ.नवनाथ घुगे, डॉ.गणेश ढवारे यांचा समावेश होता.यावेळी मान्यवरांचा होळ ग्रामस्थांच्या वतीने सपत्नीक सत्कार करण्यात आला.

ग्रामस्थांच्या पुढाकाराने पार पडलेल्या या सोहळ्यास परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने हजेरी लावली. होळ गावातील दोन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा झालेला हा गौरव सोहळा ग्रामस्थांसाठी अभिमानाचा क्षण ठरला.यावेळी जिल्ह्या तील राजकीय, सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरही यावेळी उपस्थित होते.
आठवणींना उजाळा
या सोहळ्यात संभाजीराव शिंदे व अंकुशराव शिंदे यांनी आपल्या मनोगतातून शालेय जीवनापासून ते आजवरच्या प्रवासातील अनेक आठवणींना उजाळा दिला.दोघेही बनेश्वर शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थीअसल्याने शिक्षण संस्थेबद्दल व होळच्या मातीतून मिळालेल्या संस्कारां बद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.त्यांच्या भाषणातून गावाशी असलेली घट्ट नाळ प्रकर्षाने जाणवली.



