सामाजिक

केजच्या नगराध्यक्षा सौ.सिताताई बनसोड यांना डॉक्टरेट पदवी प्रदान 

केज/प्रतिनिधी

केजच्या नगराध्यक्षा सौ.सीताताई प्रदीप बनसोड यांना युनिव्हर्सिटी ऑफ टोलोसा,मेक्सिको यांच्या मार्फत मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे.

सीताताई बनसोड या वयाच्या 25 व्या वर्षा पासून समाज कार्यात झोकून देऊन कार्य करत आहेत,ताईंच्या कामाची सुरुवात बजरंग नगर केज येथे शाळाबाह्य मुलांना मुख्य प्रवाहात आणून शिक्षणाची गोडी निर्माण करण्याचं काम केले. महिला बचत गटातून महिलाना स्वयं रोजगार आणि आत्मनिर्भर करण्याचे काम सीताताई यांनी केले, शेतकरी, शेतमजूर, महिलांचे व बालकांचे प्रश्नावर ताईने नाविन्य पूर्ण काम केले आहे, बालकल्याण समिती च्या माध्यमातून पूर्ण बीड जिल्ह्यात ताईने आपल्या कामाचा नाव लौकिक मिळवला आहे.मानवी हक्क अभियान मध्ये काम करता असताना दलीत, महिला आणि समाजाच्या शेवटच्या घटका पर्यंत काम करून समाजाच्या शेवटच्या घटकाला न्याय मिळेल या शुद्ध हेतुने ताई काम करत आहेत.

रोटरी क्लब ऑफ केज च्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून सुद्धा ताईंचे काम उल्लेखनीय आहे, केज शहराच्या नगराध्यक्ष पदी निवड सक्षम महिला नगराध्यक्ष म्हणून त्याचं काम अतिशय उल्लेखनीय आहे.सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात मागील 25 वर्षात झालेल्या कामाची पावती म्हणून युनिव्हर्सिटी ऑफ टोलोसा,मेक्सिको यांच्या मार्फत मिळालेली मानद डॉक्टरेट पदवी म्हणजे सामान्य. कार्यकर्त्याच्या कार्याला मिळालेला न्याय आहे, या मिळालेल्या डॉक्टरेट चा सर्वसामान्य व्यक्ती कडुन उत्साहात स्वागत होत आहे.आता त्यांना डॉ.सिताताई बनसोड या नावाची ओळख मिळाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!