जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा केज येथील बदली झालेल्या शिक्षकांचा सपत्नीक सत्कार करत निरोप समारंभ संपन्न

केज/प्रतिनिधी
जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा,केज येथे कार्यरत राहून शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे शिक्षक जोगदंड बालासाहेब व जाधव दत्तात्रय यांचा सपत्नीक निरोप समारंभ दि.२६ सप्टेंबर २०२५ रोजी संपन्न झाला.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुख्याध्यापक सोनवणे यांनी भूषविले तर प्रमुख अतिथी म्हणून महादेव घोरपडे,सम्मद मुल्ला,मुबाशिरोद्दिन इनामदार,अर्जून हुंबे, वंजारे मावशी,इंगळे मावशी तसेच तंत्रस्नेही शिक्षिका ढोरमारे मॅडम व इनामदार मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक वाघमारे सर यांनी करून उपस्थितांचे स्वागत केले व निरोप समारंभाचे महत्त्व स्पष्ट केले.यावेळीमान्यवरांनी आपापल्या मनोगता मध्ये जोगदंड सर व जाधव सर यांच्या कार्याचा गौरव केला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी घेतलेली मेहनत,शिस्त प्रियता आणि शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी दिलेले योगदान अधोरेखित करण्यात आले.यानंतर दोन्ही शिक्षकांचा सपत्नीक सत्कार शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.
सत्काराला प्रत्युत्तर देताना जोगदंड सर व जाधव सर यांनी शाळे तील आपल्या दीर्घ सेवेतल्या आठवणींना उजाळा देत सहकारी शिक्षक,विद्यार्थी व पालक वर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी शैक्षणिक कार्यात नेहमी सहकार्य केलेल्या सहकाऱ्यांचे कौतुक केले व पुढील काळात शाळेची प्रगती होत राहावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली.सुत्रसंचालन गायकवाड मॅडम यांनी केले ,तर आभारप्रदर्शन ढाकणे सर यांनी केले.



