मांजराचे पाणी नियोजनबध्द शेतकऱ्यांपर्यंत पोंहच करू – खा.बजरंग सोनवणे यांचे प्रतिपादन
जलपुजन कार्यक्रमाला शेतकऱ्यांची गर्दी

केज/प्रतिनिधी
शेतीसाठी पाणी आवश्यक असते. यावर्षी मांजरा धरण वेळेत पुर्ण क्षमतेने भरले असून भविष्यात मांजरा धरणाचे पाणी नियोजनबद्ध पद्धतीने शेतकऱ्यांपर्यंत पोंहोचविण्यासाठी आणि परिसराच्या विकासासाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहील असे प्रतिपादन खा.बजरंग सोनवणे यांनी केले.

केज,अंबाजोगाई,धारूर,लातूर,कळंब या शहरा सह ६१ गावांची तहान भागवणारे व मांजरा पट्टयातील पाच तालुक्यातील हजारो हेक्टर जमीन ओलिता खाली आणणारे केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरण १०० टक्के भरले आहे. दि.२६ रोजी सकाळी १० वाजता खा.बजरंग सोनवणे यांच्या हस्ते जलपुजन करण्यात आले.जलपूजन प्रसंगी माजी आमदार पृथ्वीराज साठे, राजेसाहेब देशमुख, नरेंद्र काळे,प्रकल्प अधिकारी वर्ग,पंचायत समिती सदस्य,सरपंच, उपसरपंच,चेअरमन तसेच मोठ्या संख्येने शेतकरी बांधवउपस्थित होते.
मांजरा धरण हे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आयुष्याशी,शेतीशी आणि उपजीविकेशी घट्ट जोडलेले महत्त्वाचे धरण आहे.या धरणा मुळे परिसरातील हजारो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते. दरवर्षी शेतकऱ्यांची पिकांची आशा या धरणाच्या पाण्यावरच अवलंबून असते.यंदा धरण पूर्ण क्षमतेने ॲागस्ट महिन्यातच भरल्यामुळे शेतकऱ्यां च्या चेहऱ्यावर आनंद आणि दिलासा दिसून येत आहे.मांजरा धरणाचे पाणी नियोजन बद्ध पद्धतीने शेतकऱ्यां पर्यंत पोंहोचविण्या साठी आणिपरिसराच्या विकासासाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहील,असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
मांजरा धरणातून लातूर शहर,लातूर औद्योगिक वसाहत,केज, अंबाजोगाई,धारूर, कळंब या शहराससह ६१ गावे मांजरा धरणातील पाणी पुरवठ्यावर निर्भर असतात.मांजरा धरण पिण्याचे पाण्याबरोबर शेती पिकांना लागणाऱ्या पाण्यासाठी देखील महत्त्वपूर्ण आहे. धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्या अंतर्गत बीड,धाराशिव आणि लातूर जिल्ह्या तील ७३ गावातील १८ हजार २२३ हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येते.डावा कालवा ९० कि.मी.अंतराचा आहे. त्यातून १०,५५९ हेक्टर शेती तर,उजवा कालवा ७८ कि.मी.चा असून त्या अंतर्गत ७६६५ हेक्टर शेती सिंचना खाली येते.खरीप,रब्बी व उन्हाळी हंगामासाठी सरासरी १८५ दलघमी पाण्याचा वापर होते. याशिवाय केज व कळंब तालुक्यातील २७ गावातील शेतकऱ्यांना मांजरा धरणाच्या बॅकवॉटर पाण्याचा प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष लाभ होतो अशी माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी उपस्थितांना दिली.



