सामाजिक
ऊर्मिलाताई आनंदगांवकर यांचे दुखःद निधन,परिसरात शोककळा

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील आनंदगाव येथील मूळ रहिवासी सध्या केज येथील निवासी जेष्ठ महिला उर्मिलाताई माणीकराव आनंदगांवकर वय ७१ वर्ष यांचे अंबाजोगाई येथे उपचारादरम्यान निधन झाले.मंगळवार दि.26 आॕगष्ट रोजी सायंकाळी केज येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.त्या धार्मिक प्रवृत्तीच्या व प्रेमळ स्वभावाच्या म्हणून त्या परिचित होत्या.सेवानिवृत्त प्रा. कवी माणिकराव आनंदगावकर यांच्या त्या पत्नी होत्या.त्यांच्या पश्चात पती,मुलगा,सून नातवंडे असा मोठा परिवार आहे.बँक मॅनेजर महेश कुलकर्णी यांच्या त्या मातोश्री होत त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच परिसरात शोककळा पसरली आहे.



