गुन्हेगारीसामाजिक

धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वाढत्या गुन्हेगारी घटनांवर खासदार बाजरंग सोनवणे यांची तातडीने कारवाईची मागणी

केज/प्रतिनिधी

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललाअसून, महामार्गावरील लुटमारी व वाहनचोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये मोठी भितीची भावना निर्माण झाली आहे.या वाढत्या गुन्हेगारी प्रकारांवर तातडीने लगाम लावण्यासाठी बीड लोकसभा मतदारसंघाचे खासदार बजरंग मनोहर सोनवणे यांनी जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देत कठोर पावले उचलण्याची मागणी केली आहे.

खासदारांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,तेलंगणातील राज्यकर्ते श्री.शिवराज सिंग यांना स्वतःच्या वाहनाने जाताना महामार्गावर दरोडेखोरांनी अडवून लुटण्याचा प्रयत्न केला.या घटनेत त्यांच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली असून जीवितास धोका निर्माण झाला होता.या घटनेमुळे राष्ट्रीय महामार्गावरील सुरक्षा व्यवस्था पुन्हा एकदा धोक्यात असून, प्रवाशांच्या सुरक्षेवरील गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.या पार्श्वभूमी वर खासदार सोनवणे यांनी पुढील तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.

महामार्गावरील पोलीस गस्त वाढवावी.रात्रभर विशेष पथके तैनात करून संशयितांची तपासणी करावी. महामार्गावरील सीसीटीव्ही कॅमेरे,हायवे पेट्रोलिंग व्हॅन व तात्काळ प्रतिसाद पथक सक्रिय करावे.या प्रकरणातील आरोपींचा तातडीने शोध घेऊन कठोर कारवाई करण्यात यावी.

खासदार सोनवणे यांनीप्रशासनाला स्पष्ट शब्दांत सांगितले की,प्रवाशांची सुरक्षा ही प्राथमिक जबाबदारी असून,राष्ट्रीय महामार्ग सुरक्षा व्यवस्थेमध्ये कोणतीही ढिलाई सहन केली जाणार नाही. गुन्हेगारांना अटकाव करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करून नागरिकांचा विश्वास परत मिळवावा, असेही त्यांनी आदेशात नमूद केले आहे. यापूर्वी ही नागरिकांकडून महामार्गावरील वाढत्या असुरक्षिततेविषयी तक्रारी येत असून,या तक्रारींवर कार्यवाही करण्यास प्रशासनाने तातडी दाखवावी अशी सर्व सामान्यांचीही अपेक्षा आहे.खासदारांच्या हस्तक्षेपामुळे आता या प्रकरणाला वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी जिल्हा पोलिस प्रशासन कोणत्या पावलं उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!