केज येथे सदगुरु ब्रम्ह चैतन्य गोंदवलेकर महाराज जन्मोत्सव सोहळ्या निमित्त भव्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

केज/प्रतिनिधी
श्रीराम भक्त,सदगुरु ब्रम्ह चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या १३ व्या जन्मोत्सवानिमित्त केज शहरात भव्य धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.हे कार्यक्रम शुक्रवार, दिनांक २३ जानेवारी ते शुक्रवार,दिनांक ३० जानेवारी २०२६ या कालावधीत श्रीराम मंदिर, पाटील गल्ली,केज येथे पार पडणार आहेत.
या जन्मोत्सवा अंतर्गत दररोज विविध धार्मिक उपक्रम राबविण्यात येणार असून त्यात श्रीराम कथा,कीर्तन,भजन व महाप्रसादाचा समावेश आहे.शुक्रवार,दिनांक २३ ते गुरुवार, दिनांक २९ जानेवारी २०२६ या कालावधीत दररोज सायंकाळी ५ ते ८ या वेळेत श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले आहे.
या श्रीराम कथेचे गायन ह.भ.प.साध्वी डॉ. लोपामुद्राताई सदाशिव बनसोडे(एम.फिल,पि.एच.डी.) यांच्या सुमधुर आवाजात श्री राम कथेचे गायन केले जाणार आहे. शुक्रवार,दिनांक ३० जानेवारी २०२६ रोजी सकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी जयंती उत्सव साजरा करण्यात येणार असून सकाळी ७ वाजता महाराजांचा अभिषेक करण्यात येणार आहे.तर सकाळी १० ते १२ या वेळेत ह.भ.प.श्रीराम महाराज जोशी(केजकर) यांचे कीर्तन होणार आहे. त्यानंतर ह.भ.प.श्री उमाशंकर महाराज शिंदे सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस उप निरीक्षक यांच्या सुमधुर काल्याचे कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन किसन महाजन उमाशंकर शिंदे साबला, जोशी साहेब,श्रीराम शेटे व गोंदवलेकर महाराज भक्त परिवार मंडळ केज यांच्या वतीने करण्यात आले आहे. या धार्मिक सोहळ्यास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन आयोजकांनी केले आहे.



