सामाजिक

स्वानंद सार्वजनिक वाचनालयात भारतीय स्वातंत्र्यदिन,हर घर तिरंगा,घर घर तिरंगा व क्रांतीदिन विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी संपन्न.

केज/प्रतिनिधी

स्वानंद सार्वजनिक वाचनालय,आनंदगांव ता.केज जि.बीड येथे भारतीय स्वातंत्र्यदिन, हर घर तिरंगा,घर घर तिरंगा व क्रांतीदिन व्याख्यान,परिसंवाद, चर्चासत्र,ग्रंथप्रदर्शन आदी सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्साहात संपन्न झाला.दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी भारतीय स्वातंत्र्यदिन परिसंवाद,चर्चासत्र, व्याख्यान कार्यक्रम घेवून साजरा करण्यात आला.सर्वकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ.अंजना गोविंद गायकवाड या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच सौ.आशा शंकर शिंदे,ग्रामसेवक डि.एस.सरवदे,सुंदर गायकवाड,शिवाजी गायकवाड,दादासाहेब गायकवाड यांची उपस्थिती होती.पाऊस चालू असल्यामुळे वाचन कक्षातच ग्रंथ प्रदर्शन घेण्यात आले.

सर्वप्रथम महात्मा गांधी, डॉ.राजेंद्र प्रसाद,पंडित जवाहरलाल नेहरू,डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला सरपंच, उप सरपंच,ग्रामसेवक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पुजन व वंदन करण्यात आले.

त्यानंतर परिसंवाद घेण्यात आला.यामध्ये उपसरपंच सौ.आशा शिंदे,ग्रामसेवक डि.एस. सरवदे,सुंदरगायकवाड, शिवाजी गायकवाड, दादासाहेब गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.ग्रंथ प्रदर्शनाचेही मान्यवरांनी कौतुक केले.त्यानंतर ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष,जेष्ठ विचारवंत, जेष्ठ समाजसेवक, ख्यातनाम वक्ते,परखड व्याख्याते प्राचार्य डॉ. वसुदेवबप्पा गायकवाड यांचे व्याख्यान झाले.

यावेळी शिवदास गायकवाड,बबन पुंड, एस.के.वैरागे,ह.भ.प. महादेव पुरी महाराज, वेदिका गायकवाड, नंदिता गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

दिनांक १३,१४,१५ ऑगस्ट २०२५ सलग तीन(३) दिवस “‘ हर घर तिरंगा – घर घर तिरंगा”कार्यक्रम घेण्यात आला.३ दिवस अध्यक्षस्थानी उद्धव गायकवाड हे होते.दि. १३ऑगस्ट २०२५ रोजी वसुदेवबप्पा गायकवाड दिनांक १४ ऑगस्ट २०२५ रोजी दादासाहेब गायकवाड तर दि.१५ ऑगस्ट २०२५ रोजी. ह.भ.प.नारायण महाराज गायकवाड यांचे व्याख्यान झाले व सलग 3 दिवस ध्वजारोहण करण्यात आले.दिनांक ९ ऑगस्ट २०१५ रोजी क्रांतीदिन साजरा करण्यातआला.

जेष्ठ विचारवंत डॉ. वसुदेवबप्पा गायकवाड यांचे व्याख्यान झाले अध्यक्षस्थानी बाळासाहेब गायकवाड हे होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!