सुमेध (बप्पा) शिंदे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुकबधिर,ज्ञानप्रबोधिनी व नालंदा विद्यालयात शालेय साहित्य वाटप

केज/प्रतिनिधी
नगरसेवक सुमेध(बप्पा) शिंदे यांचा वाढदिवस म्हणजेच स्मृती दिन दिनांक १५ ऑगस्ट रोजी असतो त्या निमित्ताने त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त एल.एफ.सी. ग्रुप व सुमेध बप्पा शिंदे विचार मंच यांच्या वतीनेविविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.दि.१५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९ वाजता ज्ञानप्रबोधिनी विद्यामंदिर,फुलेनगर, केज येथे शालेयसाहित्य वाटप व १० वाजता नालंदा विद्यालय, फुलेनगर,केज येथे शालेय साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न झाला. तसेच दुपारी ११.०० वाजता मुकबधिर शाळा उमरी (केज) येथे शालेय साहित्य व फळ वाटप करण्यात आले. यानंतर उपजिल्हा रुग्णालय,केज येथेही फळ वाटपाचा कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमास जेष्ठ नेते हारूणभाई इनामदार नगराध्यक्षा सौ. सीताताई बनसोड, शाळेच्यामुख्याध्यापिका शिंदे मॅडम व सुर्यवंशी मॅडम नालंदा विद्यालय चे मुख्याध्यापक नंदकुमार मस्के, ज्ञानप्रबोधिनी शाळेचे मुख्याध्यापक दयानंद देशमुख सर तसेच शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते
या कार्यक्रमांना विवेक बनसोड,किरण जोगदंड अमोल मिसाळ,अशोक गायकवाड,अशोक धिवार,बाळा इनकर, सुहास समुद्रे,विनोद इनकर,गणेश गालफाडे, अभिजीत तुपारे,विकी लांडगे,प्रेम मस्के, आकाश शिंदे,संदेश ताकतोडे,लखन हजारे, रेवन आप्पा नखाते, पवन बनसोड,विकी लोखंडे,प्रवीण लांडगे, आदित्य मस्के,आदित्य जावळे,बाळा भांगे, शाहरूख पटेल,ओम शिनगारे,सूरज वैरागे, सोनू लष्करे,सोनू जोगदंड,प्रदीप गायकवाड,कुणाल पोळ आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन एल.एफ.सी.ग्रुप व सुमेध बप्पा शिंदे विचार मंच यांनी केले. उपस्थित मान्यवरांनी दिवंगत सुमेध शिंदे यांच्या कार्याचा गौरव करत समाजोपयोगी उपक्रमांद्वारे त्यांची आठवण जपण्याचा संकल्प व्यक्त केला.



