गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा, गुढीपाडवा नव्या सुरुवातींचा सण

गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा, गुढीपाडवा नव्या सुरुवातींचा सण गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा पहिला दिवस. वसंत ऋतूच्या आगमना सोबत येणारा हा सण आनंद,उत्साह आणि नव्या आशांनी भरलेला असतो. प्रत्येकाच्या आयुष्यात नवीन संधी, नवीन स्वप्नं आणि सकारात्मकतेची सुरुवात या दिवसापासून होते.
या दिवशी घरासमोर उभारलेली गुढी ही विजय,समृद्धी आणि मंगलतेचं प्रतीक मानली जाते.गुढी म्हणजे फक्त एक सजावट नसून,ती आपल्या आयुष्यातील अडचणींवर मिळवलेल्या यशाची आणि पुढे जाण्याच्या आत्मविश्वासाची खूण आहे.असे मानले जाते की प्रभु श्रीराम यांनी रावणावर विजय मिळवून अयोध्येत परत आल्याच्या आनंदात गुढी उभारली गेली.
गुढीपाडव्याच्या दिवशी कडू-गोड अशा नीम -गुळाच्या मिश्रणाचा प्रसाद घेतला जातो. यामागचा संदेश असा की आयुष्यातील गोड आणि कडू अनुभव समान भावनेने स्वीकारावे. जीवनात सुख-दुःख येत राहतात,पण त्यातूनच आपल्याला शिकायला मिळतं.या सणानिमित्त घरांची साफसफाई,सुंदर रांगोळ्या,नवीन कपडे, गोडधोड पदार्थ आणि कुटुंबासोबत घालवलेले आनंदाचे क्षण हे सगळं वातावरण अधिक आनंदी आणि उत्साही बनवतं.गुढीपाडवा आपल्याला सांगतो की, भूतकाळातील वाईट गोष्टी मागे सोडून नव्या आशांनी आणि सकारात्मक विचारांनी पुढे जायचं.प्रत्येक नवीन दिवस हा एक नवीन संधी घेऊन येतो फक्त ती ओळखण्याची आणि स्वीकारण्याची गरज असते.नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात सुख,शांती, आरोग्य आणि यश घेऊन येवो हीच शुभेच्छा!
श्री.बाजीराव नवनाथ ढाकणे
बीड जिल्हा समन्वयक , लेक लाडकी अभियान, महाराष्ट्र राज्य , मो.9421989909



