बनसारोळा येथे करू वंदन जोतिबांना संगीतमय आविष्कारातून महात्मा फुलेंना अभिवादन

केज/प्रतिनिधी
क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त क्रांतिसूर्य प्रतिष्ठान,बनसारोळा च्या वतीने आयोजित “करू वंदन जोतिबांना” हा संगीतमय कार्यक्रम अत्यंत चैतन्यपूर्ण आणि उत्साही वातावरणात संपन्न झाला.सुरांच्या आणि शब्दांच्या माध्यमा तून महापुरुषांच्या विचारांचा जागर करत ग्रामस्थांना मंत्रमुग्ध करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन रमेशराव आडसकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून युसुफ वडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र शेंडगे उपस्थित होते. उद्घाटन प्रसंगी बोलताना मान्यवरांनी क्रांतिसूर्य प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेले स्वररत्न सुभाष शेप आणि शाहीर मामा काळे यांनी आपल्या सहकाऱ्यां सह महा पुरुषांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी गीते सादर केली. क्रांतिसूर्य प्रतिष्ठान गेल्या अनेक वर्षांपासून विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजात एकोपा आणि प्रबोधन घडवून आणण्याचे कार्य सातत्याने करत आहे. भविष्यातही असेच सामाजिक बांधिलकी जपणारे कार्यक्रम राबवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजय काळे यांनी केले, तर संपूर्ण सूत्रसंचलन शाहीर तुकाराम सुवर्णकार यांनी केले.



