कृषीसामाजिक

शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी सरकारला भांडू खा. बजरंग सोनवणे यांचा शेतकऱ्यांना शब्द केज, धारूर,परळी तालुक्यात अतिवृष्टीग्रस्तांच्या घेतल्या भेटी

बीड/प्रतिनिधी

बीड जिल्ह्यात अतिवृष्टी झाली.नद्यांना इतका मोठा महापूर आला की, जमीनी वाहून गेल्या पिकात अजून पाणीच आहे.यामुळे शेतकरी कोलमडून गेला आहे. आर्थीक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारने भरीव मदत करावी तसे न केल्यास आपण सरकारला शेतकऱ्यां साठी कोणत्याही पातळीवर भांडू,असा शब्द खा.बजरंग सोनवणे यांनी अतिवृष्टी ग्रस्तांना दिला.तीन दिवसांपासून खा.बजरंग सोनवणे अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करत आहेत.

केज, बीड,शिरूर मतदारसंघात दोन दिवस पाहणी केल्या नंतर दि.२५ सप्टेंबर रोजी केजतालुक्यातील दैठणा, राजेगाव, धारूर तालुक्यातील फकीर जवळा,परळीतील सिरसाळा, गोवर्धन, हिवरा,जळगव्हाण, पोहनेर,तेलसमुख, बोरखेड, ममदापूर, कौडगाव या गावातील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली.यावेळी पुढे बोलताना खा.बजरंग सोनवणे म्हणाले,दहा दिवसांपासून जिल्ह्यात अतिवृष्टी होत आहे.

आधी आष्टी तालुक्यात अतिवृष्टी झाली त्या ठिकाणी मी तातडीने जावून संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची विचारपूस केली,धीर दिला.यानंतर मागील चार दिवसांपुर्वी जिल्हाभरात सर्वत्रच अतिवृष्टी झाली.जिल्हा मोठा आहे,मी सकाळी सहा वाजता घर सोडून शेतकऱ्यांना भेटण्या साठी जात आहे. अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर ची चिंता बघवत नाही. पण शेतकऱ्यांनी खचून जावू नये,सरकारकडून मदत मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. यासाठी वेळप्रसंगी आम्ही सरकारशी भांडू, पण तुम्हाला मदत मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत.

जिल्ह्यात नदीकाठी असलेल्या गावात पाणी शिरलेले आहे.शेतातील पिके, जमीन,विहीरी शेतकऱ्यांच्या डोळ्या देखत वाहून गेल्या. कधी नव्हे इतके पाणी नागरिकांनी पाहिले. जिल्ह्यात जवळपास साडेतीनशे कोटींचे शासकिय मालमत्तेचे नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांचे,व्यापाऱ्यांचे किती नुकसान याचा अजून यंत्रणेकडे आकडा आलेला नाही. हे नुकसान कोटीत असणार आहे.शेतकरी या पावसाने उध्वस्त करण्याचे काम केले आहे.

सरकारकडून भेटी सुरू आहेत,परंतु अजून ठोस पावले सरकारने उचलले नाहीत.जर ते ठोस पावले उचलत नसतील तर शेतकरी पुढे येवून सरकार विरूध्द उभा राहतील. आम्ही अतिवृष्टीग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी कुठेही कमी पडणार नाहीत,असेही खा.बजरंग सोनवणे म्हणाले,यावेळी त्यांच्या सोबत राष्ट्रवादीचे नेते राजेसाहेब देशमूख आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!