
बीड/प्रतिनिधी
दि.१४ आणि १५ सप्टेंबर रोजी रात्री असे सलग दोन दिवस बीड जिल्हा वासियांना अतिवृष्टीने झोडपले आहे.यामुळे बीड जिल्ह्यातील सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत.परिणामी, शेतकऱ्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अनेक भागात पिके पाण्यात असून काही ठिकाणी नदीपात्रा शेजारील जमीनी देखील खरडून गेल्या आहेत.शिवाय घरांची देखील पडझड झालेली असून नुकसानीचे तातडीने पंचनामे करून सरसकट नुकसान भरपाई द्यावी,अशी मागणी खा.बजरंग सोनवणे यांनी पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.पालकमंत्री अजित दादा पवार यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे,बीड जिल्ह्यात सलग पावसा मुळे अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सकाळी सात वाजल्या पासून स्वत: परिस्थिती वर लक्ष ठेवून आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील कडा गावातील ११,चोभा निमगावातील १४,घाटा पिंपरीतील ७, पिंपरखेडातील ६, धानोऱ्यातील ३ व डोंगरगणमधील ३ नागरिक असे मिळून ४४ लोक अडकलेले होते.
याच बरोबर जिल्ह्यातील बीड तालुक्यातील नाळवंडी, नेकनूर,येळंबघाट,आष्टी तालुक्यातील दौला वडगाव,धानोरा,कडा, पिंपळा, टाकळसिंग, दादेगाव, अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी, पाटोदा, केज तालुक्यातील मधील , केज, यूसूफ वडगाव, होळ, शिरूर तालुक्या तील शिरूर महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद आहे.आष्टी तालुक्यात तर कडा आणि परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे. कधी नव्हे ते नदीला मोठा पुर आला. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होत. तर अनेक भागात मुसळधार पावसामुळे विविध नद्यांच्यापाण्याने पात्र ओलांडल्याने शेतात पाणी शिरले आहे.शिवाय जमीन खरडून गेल्या आहेत.
यामुळे पिकांचे आणि शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.याच बरोबर काही भागात घरांची पडझड देखील झाली आहे. आष्टी तालुक्यात पुराचे पाणी घरात घुसून संसारोपयोगी साहित्याचेही नुकसान झाले आहे.यामुळे शासनाने तातडीने स्पॉटवर जावून पंचनामे करावेत व सरसकट नुकसान भरपाई द्यावी, असे पत्रात म्हटले आहे.



