परळी येथील खुनाच्या प्रकरणी नागरिकांना एसआयटी प्रमुख आयपीएस अधिकारी पंकज कुमावत यांचे आवाहन

बीड/प्रतिनिधी
परळी वैजनाथ जि.बीड येथे महादेव दत्तात्रय मुंडे यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी महत्त्वाची माहिती असलेल्या नागरिकांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे.दि. २९ ऑक्टोबर २०२३ रोजी रात्री ८ ते ९ वाजता परळी कोर्टा समोर गोळ्या झाडून त्यांची हत्या झाली होती.याप्रकरणी परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद असून कलम ३०२ भा.दं.वि.अंतर्गत तपास सुरू आहे.
गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी आयपीएस अधिकारी पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (SIT) नेमण्यात आले आहे. जर कोणाकडे या प्रकरणी कोणतीही महत्त्वाची माहिती असेल तर ती थेट आयपीएस पंकज कुमावत यांना मोबाईल क्रमांक९९२३०७२८३३वर देता येईल.
https://youtu.be/FOS6efrz-LU?feature=shared
पोलिसांना माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल तसेच त्यांची ओळख उघड केली जाणार नाही असे स्पष्ट केले आहे.तसेच योग्य माहिती देणाऱ्यास उचित बक्षीस दिले जाणार आहे.



