सामाजिक

रमेश तात्या गालफाडे यांच्या वाढदिवसानिमित्त स्वामी समर्थ वृद्धाश्रमात आजी-आजोबांना अल्पोहार व फळ वाटप

केज /प्रतिनीधी

स्वामी समर्थ वृद्धाश्रमा तील आजी-आजोबांना केज तालुका कला क्रीडा विश्व समितीच्या वतीने अल्पोहाराचे व फळांचे वाटप करण्यात आले.बहुजन विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते रमेश तात्या गालफाडे यांचा वाढदिवस केज शहरा मध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. केज तालुका कला क्रीडा विश्व समितीच्या वतीने रमेश तात्या गालफाडे यांच्या वाढदिवसानिमित्त केज शहरा लगत बोबडेवाडी रोडवरील असणाऱ्या स्वामी समर्थ वृद्धाश्रम या ठिकाणी अल्पोपहार व फळांचे वाटप करून रमेश तात्या गालफाडे यांचा वाढदिवस हा वृद्धाश्रमातील आजी- आजोबा यांच्या समवेत साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाची सुरुवात राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत संयुक्त जयंती साजरी करण्यात आली.स्वामी समर्थ वृद्धाश्रमाला कुठलेही शासनाचे अनुदान नसताना महादेव बापू कराड हे सध्या स्वखर्चाने हे वृद्ध आश्रम चालवतात कुठल्याही शासनाची सवलत नाही किंवा कसलाही आधारनसताना वृद्धाश्रम चालवतात या वृद्धाश्रमात एकूण नऊ महिला व चार पुरुष आहेत.यांचा सर्व खर्च दवाखान्याचा असेल किंवा इतर कुठलाही खर्च महादेव बापू कराड हे स्वतः करतात.कला क्रीडा विश्व समितीच्या वतीने या वृद्धाश्रमामध्ये फळाचे व अल्पोहाराचे वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी कला क्रीडा विश्व समितीचे अध्यक्ष अनिल वैरागे, उपाध्यक्ष मुनीर कुरेशी,ज्येष्ठ नागरिक बिबीशन ठोंबरे,धनराज भालेराव,उमाकांत बोधने, सिंधुताई मुळे,सुनिताताई बोधने तसेच गावकरी मंडळी हे देखील यावेळी उपस्थित होते. महादेव बापु कराड व आजी आजोबा यांनी रमेश तात्या गालफाडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व आभार व्यक्त केले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!