सामाजिक

मूकनायकच्या वर्धापन दिनी केज येथे पत्रकारितेच्या विद्रोही परंपरेचा जागर

केज/प्रतिनिधी

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दि.३१ जानेवारी १९२०रोजी सुरू केलेल्या ऐतिहासिक ‘मूकनायक’ वृत्तपत्राच्या वर्धापन दिना निमित्त शासकीय विश्रामगृह,केज येथे सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.व मुकनायक दिन साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाला पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.मूक व वंचित समाजाला नायक आवाज देणाऱ्या या वृत्तपत्राच्या वैचारिक परंपरेचा जागर करत पत्रकारितेची सामाजिक जबाबदारी अधोरेखित करण्यात आली.या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते श्री.बाबुराव गालफाडे सर यांच्या हस्ते पत्रकार बांधवांना भारतीय संविधानाच्या प्रती प्रदान करण्यात आल्या.संविधानातील समता,स्वातंत्र्य,बंधुता व न्याय ही मूल्ये पत्रकारिते ची मूलभूत शक्ती असून, सत्य आणि अन्याया विरुद्ध उभे राहणे हेच पत्रकाराचे खरे कर्तव्य असल्याचे याप्रसंगी व्यक्त करण्यात आले.

या कार्यक्रमास आझाद क्रांती सेनेचे तालुका उपप्रमुख श्री.अनिल लोखंडे,सामाजिक कार्यकर्ते ईरफान पठाण यांच्यासह तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांनी मूकनायकने अस्पृश्य व वंचित समाजाच्या वेदना,विद्रोह व हक्कांना वाचा फोडत दलितपत्रकारितेचा पाया घातल्याचे नमूद केले. मूकनायक हे केवळ वृत्तपत्र नसून,अन्यायी समाज रचनेविरुद्ध लढणारे वैचारिक अस्त्र होते.शिक्षण,हक्क व आत्मसन्मानाची जाणीव निर्माण करत मूक समाजाला नायक बनवण्याचे ऐतिहासिक कार्य या पाक्षिकाने केले. त्यामुळेच दि.३१जानेवारी हा दिवस दलित पत्रकारितेचा आणि सामाजिक न्यायाच्या संघर्षाचा प्रतीक म्हणून साजरा केला जातो.

एकूणच,केज येथे साजरा झालेला मूकनायकचा वर्धापन दिन हा पत्रकारितेने संविधानाच्या मूल्यांशी निष्ठा ठेवून समाजातील शेवटच्या घटकाचा आवाज बनावे, हा एकसूत्री संदेश देणारा ठरला.या कार्यक्रमात पत्रकार गौतम बचुटे व महादेव गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गौतम बचुटे यांनी केले तर विजय आरकडे यांनी आभार प्रदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!