सामाजिक

कानडीमाळी येथे अँड. सुभाष भाऊ राऊत यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी समाजाची बैठक संपन्न‌

केज/प्रतिनिधी

कानडीमाळी येथे दिनांक 24 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता कानडीमाळी गावात सकल ओबीसी समाजाची आरक्षण बचाव व रविवारी होणाऱ्या सभेची नियोजन बैठक कानडी माळी गावात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस गावासह इतर गावांतील ओबीसी समाजातील सर्व नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.या वेळी सभेला मागदर्शन अँड. सुभाष भाऊ राऊत यांनी केले व गावातील सर्व ओबीसी बांधवांनी बीड येथे होणाऱ्या विराट ओबीसी महा एल्गार सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन सुभाष भाऊ राऊत यांनी केले त्या नंतर जेष्ठनेते बापुसाहेब भुजबळ आवर्जुन उपस्थित होते.

त्यांनी सभेला उपस्थित ओबीसी बांधवाना आवाहन केले की, आपले शैक्षणिक, सामाजिक आरक्षण हिसकावुन घेण्याचा प्रयत्न काही राजकीय नेते व जातीवादी लोक जाणूनबुजून गोरगरीब ओबीसी समाजाचे आरक्षण लुबाडत आहेत.न्याय पालिकेने कोर्टाने दोनदा मराठा समाजाला आरक्षण नाकारले कारण मराठा समाज मागास नाही तरी पण ओबीसी समाजाची मागणी आहे की,मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दयावे हीच मागणी आहे तरी काही मराठा समाजाचे ब्रिगेडी विचार धारेचे लोक जाणूनबुजून महाराष्ट्रात सामाजिक सलोखा बिघडण्याचे काम करित आहेत.

सरकार वर दबाव टाकून हैद्राबाद गॅजेट लागू करून खोटे कुणबी प्रमाणपत्र व खाडाखोड करून कुणबी प्रमाणपत्र काढत आहेत.हैद्राबाद गॅजेट मध्ये सुद्धा मराठा व कुणबी ही वेगवेगळी जात आहे हे नमूद आहे तरी पण आम्हाला कुणबी दाखले द्या ओबीसीतच द्या अशी मागणी करित आहेत सरकार ने तात्काळ कुणबी दाखले देणे थांबवले पाहिजे व बेकायदा काढलेला जीआर रद्द करावा असे मत बापुसाहेब भुजबळ यांनी व्यक्त केले.

सरकार हे संविधानाच्या चौकटीत चाललेपाहिजे देशात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान असताना निजामाचे हैद्राबाद गॅजेट लागू करून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा अपमान केला आहे तरी सरकारने तात्काळ जीआर रद्द करावा अशी मागणी केली आहे अन्यथा सकल ओबीसी समाज महाराष्ट्रभर पुर्ण ताकदीने रस्त्यावर उतरून सरकाला वठणीवर आणल्या शिवाय शांत बसणार नाहीत त्यामुळे रविवारी बीड येथे होणाऱ्या ओबीसी समाजाच्या महाएल्गार सभेला लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जनतेला केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!