डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानावर देश चालतो हि बाबासाहेबांची महानता – डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड

केज/प्रतिनिधी
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या व सर्वांना समान अधिकार एक व्यक्ती एकच मताची तरतूद घटनेत केलेल्या याच घटनेवर देश चालतो हि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची महानता आहे असे प्रतिपादन डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड यांनी केले.स्वानंद सार्वजनिक वाचनालय, आनंदगांव ता.केज जि. बीड येचे १४ एप्रिल २०२६ रोजी आयोजित भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयोजित ग्रंथप्रदर्शन, व्याख्यान,वक्तृत्व स्पर्धा, कथाकथन स्पर्धा, रंगभरण स्पर्धा,ग्रंथवाचन आदी कार्यक्रम घेण्यात आले.अध्यक्षस्थानी ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष,जेष्ठ विचारवंत, जेष्ठ समाजसेवक, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते व परखड व्याख्याते डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड हे होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोप प्रसंगी डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड बोलत होते.सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पन करून पुजन व वंदन करण्यात आले.
त्यानंतर एस.के.वैरागे, माजी सरपंच रामराजे गायकवाड,ग्रंथालयाचे आनंद भैय्या गायकवाड यांची थोडक्यात व्याख्याने झाली.त्यानंतर ग्रंथवाचन घेण्यात आले. ऋषीकेश गायकवाड, सुशांत सौदागर,बालाजी टिंगरे,यशवंत सौदागर यांनी ग्रंथवाचन केले. रंगभरण स्पर्धेत यशवंत सौदागर,सुशांत सौदागर, बालाजी टिंगरे यांनी विशेष प्राविण्य मिळविले
वक्तृत्व स्पर्धेत यशवंत सौदागर,सुशांत सौदागर, बालाजी टिंगरे यांनी विशेष प्राविण्य मिळविले,कथाकथन स्पर्धेत यशवंत सौदागर, बालाजी टिंगरे,सुशांत सौदागर यांनी विशेष प्राविण्य मिळविले.ग्रंथ प्रदर्शनात दादासाहेब गायकवाड, ए. बी.गायकवाड,प्रकाश गायकवाड,बाळासाहेब गायकवाड, आनंद भैय्या गायकवाड,शिवम गायकवाड,माऊली कदम, माजी सरपंच शिवाजीराव गायकवाड यांच्यासह मोठया संख्येने विद्यार्थी,वाचक सहभागी झाले.सर्व स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण माजी सरपंच शिवाजीराव गायकवाड व डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. शिवाजीराव गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. सकाळी ८ ते रात्री ५ पर्यंत ग्रंथप्रदर्शन चालले. शेवटी अध्यक्षीय समारोप डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड यांनी केला.



