सोनिजवळा येथील मागासवर्गीय स्मशान भूमीवरील अतिक्रमण हटवून मोजणी करा – दीपक कांबळे

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील सोनीजवळा येथील मागासवर्गीय समाजाची स्मशानभूमी वरील लगत सर्वेची मोजणी करून हद्द कायम करण्याचं मागणी रिपाइंचे तालुकाध्यक्ष दीपक कांबळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
रिपाइंचे तालुकाध्यक्ष दीपक कांबळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा संघटक रवींद्र जोगदंड, गौतम बचुटे,रोहित कांबळे, जोगदंड, पांडुरंग जोगदंड केज यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार राकेश गिड्डे यांना निवेदन दिले आहे त्या निवेदनाद्वारे अशी मागणी करण्यात आली आहे की, सोनीजवळा ता.केज येथील मागासवर्गीय समाजा च्या स्मशान भूमी लगत सर्वे नं १२२/अ /१ हा पूर्ण सर्वे नं मोजून त्या बांधावर दलित स्मशान भूमी लगत होणारी पायवाट रस्ता त्या सर्वे नं बांधावरून करण्यात यावा.
तसेच गावठाण अंतर्गत दलित स्मशान भूमीमध्ये असलेले लुकमान दिलावर शेख, अलीम दिलावर शेख, सुबराव बन्सी जोगदंड यांचे पत्र्याचे शेड व कच्चे घर आणि तसेच समीर सय्यद यांचे प्लॉटिंगचे अतिक्रमण हटवून न्याय देण्यात यावा.या स्मशानभूमी च्या बांधावरील पायवाट रस्ता दि.२१ ऑगस्ट २०२५ रोजी मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांनी केलेल्या पंचनाम्या नुसार करण्यात यावा.



