सामाजिक

शिस्त- लयबद्धतेचा संगम, संघाचे अंबाजोगाईत ऐतिहासिक पथसंचलन

अंबाजोगाई (प्रतिनिधी)

शताब्दी वर्षात प्रवेश करत असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी रविवारी सायंकाळी ऐतिहासिक पथसंचलन काढले. यात स्वयंसेवकांच्या शिस्त व लयबद्धतेचे अंबाजोगाई करांना दर्शन झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर रविवारी अंबाजोगाईत पथसंचलन निघाले.संस्कार-शिस्त आणि राष्ट्रभक्तीचे बीज, शिस्तबद्ध संचलनात दिसलेली संस्कारांची झलक अशा अद्वितीय संगमाचा प्रत्यय अंबाजोगाई करांनी अनुभवला.

संस्कारांतून नागरिक, नागरिकांतून राष्ट्र असे विचार पाहून नागरिकदेखील त्याच ऊर्जेने प्रतिसाद देताना दिसले. शंकर महाराज वंजारी वसतिगृहाच्या मैदानावरून निघालेले संचलन सावरकर चौक,छत्रपती शिवाजी महाराज चौक, गुरुवरपेठ, मंडीबाजार, पाटील चौक, कुतर विहीर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे परत शंकर महाराज वंजारी वसतिगृहाच्या मैदानावर पोहोंचली. याठिकाणी शस्त्रपूजन व प्रमुख मार्गदर्शन झाले. व्यासपीठावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून देवगिरीप्रांत

सदभाव प्रमुख ॲड आशिष जाधव, मुकुंदराज संस्थांनचे अध्यक्ष ह.भ.प.किसन महाराज पवार, प.पू. शंभूलिंग शिवाचार्य महाराज, जिल्हा संघचालक जयप्रकाश तोष्णीवाल, जिल्हा सहकार्यवाह बिपीन क्षीरसागर,शहर संघचालक निवृत्ती दराडे,उपस्थित होते.या संचलनात स्वयंसेवक व नागरिक उपस्थित होते.

संघाची शाखा हे व्यक्ती निर्माणाचे केंद्र: ॲड आशिष जाधव 

या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांत देवगिरीप्रांत  सदभाव प्रमुख ॲड आशिष जाधव म्हणाले की संघाची शाखा हे व्यक्तीनिर्माणाचे केंद्र आहे. राष्ट्र पुन्हा पारतंत्र्यात जाऊ नये.यासाठी एकजूट महत्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. अंबाजोगाईत संघ स्थापनेला ९० वर्षे पूर्ण झाली. यासाठी अनेक स्वयंसेवकांचे मौलिक योगदान असल्याचे त्यांनी सांगितले. किसन महाराज पवार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

ठिकठिकाणी फुलांची उधळण: 

पथसंचलन निघाले व मार्गावर नागरिकांनी ठिकठिकाणी सडा, रांगोळ्या व फुलांची उधळण करत शहर वासीयांनी संचलनाचे स्वागत केले. यावेळी भारतमाता की जय यासारखे नारे लावण्यात येत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!