
केज/ प्रतिनिधी
स्वानंद सार्वजनिक वाचनालय,आनंदगांव ता. केज जि.बीड येथे १४ ते २७ जानेवारी २०२६ या दिवसाच्या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा ग्रंथप्रदर्शन, काव्यवाचन, ग्रंथवाचन, कथाकथन, कविसंमेलन, परिसंवाद,चर्चासत्र, वक्तृत्व स्पर्धा,वाद विवाद स्पर्धा,लेखक,कवि,जेष्ठ साहित्यीकांचा सत्कार, साहित्यकांची मुलाखत, मराठी वाचन कट्टा, साहित्यीक,लेखक, कविंचे मार्गदर्शन,घोष वाक्य, शब्दकोडी, अंताक्षरी,मुलाखत, कार्यशाळा,शिबीर व विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेवून मराठी भाषा संवर्धन पंधरवडा ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष,जेष्ठ विचारवंत, जेष्ठ समाजसेवक, महाराष्ट्रातील सुप्रसिध्द वक्ते व परखड व्याख्याते, प्राचार्य,डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.
दि.१४ जानेवारी २०२६ रोजी उद्घाटन समारंभ घेण्यात आला. १४ ते २७ जानेवारी २०२६ दरम्यान नियमित सकाळी ७ ते रात्री ८ या वेळात १५ दिवस ग्रंथ प्रदर्शन घेण्यात आले. पहिल्याच दिवशी ग्रंथ प्रदर्शन,कथाकथन,वक्तृत्व स्पर्धा,काव्यवाचन, साहित्यीक,कवी यांचा सत्कार व मुलाखत घेण्यात आली.कवी प्राचार्य,डॉ.हनुमंत सौदागर यांचा सत्कार प्राचार्य,डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड यांच्या हस्ते शाल,श्रीफळ,पुष्पहार व ग्रंथ भेट देवून सत्कार करण्यात आला.यावेळी रामराजे गायकवाड, सुखदेव गायकवाड, कमलाकर साबळे, शिवदास गायकवाड यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.याच दिवशी वक्तृत्व स्पर्धा, कथाकथन,काव्यवाचन, मुलाखत इत्यादीकार्यक्रम घेण्यात आले.
दि.१५ जानेवारी २०२६ रोजी परिसंवाद,चर्चासत्र,मराठी भाषीकांचा सत्कारमहिला कवयित्री संमेलन व चर्चासत्र घेण्यात आले. अध्यक्षस्थानी ग्रंथालयाच्या सचिव तथा जेष्ठ सामाजिककार्यकर्त्या व कवयित्री सौ.छायाताई सोमवंशी या होत्या,तर कवयित्री सौ.सुरेखा ताई काळे,कल्पनाताई काळे तसेच ग्रंथालयाच्या संचालक सौ.सुमनताई गायकवाड, आजीव सदस्या सिंधुबाई गायकवाड,सौ.जयाबाई गायकवाड, रेखा रविंद्र गायकवाड रणजीत पाटील,शिवराज जाधव यांनी भाग घेतला.माहिला कविसंमेलन व ग्रंथ भेट कार्यक्रम संपन्न झाला.१६ जानेवारी २०२६ ग्रंथ प्रदर्शन, कार्यशाळा, मुलाखत इत्यादीकार्यक्रम पार पडले.या कार्यक्रमात सौरभ काळे, बालाजी काळे,लालासाहेब नाईकल, रविंद्र गायकवाड, ताराचंद गायकवाड,अरुण काळे, राजेंद्र उमाप,रणजीत पाटील यांची उपस्थिती होती.दि.१७ जानेवारी २०२६ ग्रंथ प्रदर्शन,मराठी वाचन कट्टा,ग्रंथ समिक्षण इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले.
दि.१८ जानेवारी २०२६ रोजी बालकाव्य वाचन घेण्यात आले.दि. २०,२१,२२,२३,२४ जानेवारी ग्रंथ प्रदर्शन घेण्यात आले.२५ जानेवारी ग्रंथप्रदर्शन व वाद – विवाद स्पर्धा,२६ जानेवारी ग्रंथप्रदर्शन, वक्तृत्व स्पर्धा,घोषवाक्य, रॅली,शब्दकोडी,अंताक्षरी, परिसंवाद, चर्चासत्र, इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले.सरपंच सौ.अंजना गोविंद गायकवाड,ग्राम पंचायत अधिकारी डी.एस.सरवदे, विजय थोरात,शिवाजी गायकवाड,अशोक भोगजकर,गोविंद गायकवाड,निलेश गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. २७ जानेवारी ग्रंथप्रदर्शन, कार्यशाळा,शिबीर घेण्यात आले. ग्रंथ प्रदर्शन,ग्रंथ वाचन,काव्य वाचन, कथाकथन,व शालेय विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या.
आनंद भैय्या गायकवाड, सुशांत सौदागर,कल्याणी घोगले,वेदिका गायकवाड, दिव्या साबळे,स्वरा गायकवाड, मयुरी गायकवाड,विक्रम गायकवाड,विराज राऊत, भक्ती गायकवाड, कृष्णराजे गायकवाड, बाळासाहेब गायकवाड यांनी सहभाग घेतला.१५ दिवसीय मराठी भाषा संवर्धन पंधरवडाचा अध्यक्षीय समारोप डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड यांनी केला.मराठी माणसाने,महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक मराठी भाषीक व्यक्तीने मराठीत बोलावे,मराठीत व्यवहार करावेत,मराठीचा अभिमान आणि स्वाभीमान बाळगांवा असे आवाहन डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड यांनी केले.
दैनंदिन १५ दिवसीय मराठी भाषा पंधरवडाचे दैनंदिन प्रास्ताविक,सुत्र संचलन व आभार प्रदर्शन ग्रंथालयाचे आनंद भैय्या गायकवाड यांनी केले.व २७ जानेवारी २०२६ रोजी मराठी भाषा संवर्धन पंधरवडाचा समारोप करण्यात आला.



