सामाजिकसांस्कृतीक

सोनीजवळा येथे विजयादशमी निमित्त महाप्रसादाचे आयोजन गोविंद ससाणे,मिनाज पठाण व सहकाऱ्यांचा अनोखा उपक्रम

केज/प्रतिनिधी

विजयादशमी दसऱ्या निमित्त भवानी नगर, सोनीजवळा येथे आई जगदंबामंदिर परिसरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. गावातील सर्व भाविक भक्तांसाठी सुरू करण्यात आलेली ही परंपरा यंदापासून दरवर्षी राबवली जाणार आहे.

नवरात्र उत्सव कमिटीचे सदस्य अरबाज, फुलचंद, भालचंद्र ,अरुण ,हाजू, रज्जाक, दशरथ, सुनील, विनोद, दीपक ,साहेबा, पोपट ,बबनराव ,बाबु , रामभाऊ, अमोल, मकरध्वज, ओम, जब्बार ,आसेफ भाई ,संभू अण्णा, रवी, पप्पू आणि सर्व कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नातून या महाप्रसादाचे यशस्वी आयोजन झाले.या महाप्रसादासाठी विशेष सहकार्य गोविंद  ससाणे अध्यक्ष , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका ओबीसी सेल , मिनाज पठाण संचालक, अंबाजोगाई सहकारी कारखाना आणि रज्जाक पठाण यांनी केले.गोविंद ससाणे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “गावातील ऐक्य आणि भक्तिभाव जपण्यासाठी ही महाप्रसाद परंपरा यंदापासून दरवर्षी विजयादशमी दसरा या दिवशी सुरू राहील.” या उपक्रमामुळे गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, सर्व जाती धर्माचे शेकडो गावकरी आणि भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!