पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शिवमाला फाउंडेशनचा सहभाग,विद्यार्थ्यांना केले शैक्षणिक साहित्य वाटप

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील मांजरा नदीकाठच्या लोकांचे अतोनात नुकसान झाले असून सरकारची कुठलीही मदत अजून शेतकऱ्याला मिळालेली नाही.परंतु राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती दिवशी शिवमाला फाउंडेशन पुणे यांच्या वतीने केज तालुक्या तील मौजे राजेगाव, दैठणा, पीट्टीघाट येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जाऊन तेथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे किट वाटप करण्यात आले.
त्यामध्ये स्कूल बॅग, वह्या,पॅड,कंपास, पाण्याची बॉटल व खाद्यपदार्थाचे वाटप करण्यात आले.यावेळी शिवमाला फाउंडेशन पुणे चे अध्यक्ष प्रवीण शिवाजीराव मोरे, सदस्य रत्नमाला मोरे, ऐश्वर्या मोरे ,पूजा हंडीबाग ,नितीनजी भिसे , दुआ खान,सुरैया पठाण,अजय कांबळे, यशवंत मोरे ,गणेश मोरे हे उपस्थित होते.तसेच राजेगाव दैठणा येथील सरपंच ,उप सरपंच, पत्रकार रविंद्र मेटे तसेच गावातील तरुण मंडळी या कार्यक्रमातसहभागी होते.राजेगाव येथे कार्यक्रमाचे सूत्र संचालन शाळेचे मुख्याध्यापक वरवडे रमेश सर यांनी केले व आभार गावचे ज्येष्ठ नेते युवराज कदम यांनी मानले.



