साबला येथील ग्रामस्थांच्या वतीने ग्राम स्वच्छता अभियान संपन्न

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील मौजे साबला येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त तसेच विजयादशमी निमित्त ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले.गावातील वातावरण स्वच्छ रहावे, गावात रोगराई पसरु नये,गावातील सर्व जनतेचे आरोग्य चांगले रहावे,कोणीही आजारी पडू नये,मी गावाचा,गाव माझा,स्वच्छ गाव,सुंदर गाव हा विचार करून साबला गावात नेहमीच स्वच्छते बाबत माहिती दिली जाते.तसेच साबला येथील नागरिक ही याबद्दल जागरुक आहेत.
या ग्रामस्वच्छता अभियानात समाज सेवक आदर्श शिक्षक नरहरी काकडे,ग्राम पंचायत सदस्य ज्ञानेश्वर पांचाळ, सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन उत्तमराव काकडे,गणेश कटारे,काशिनाथ नाईकनवरे,लखनराऊत, हनुमंत परळकर, राहुल मुळे,नजीर काझी, महादेव परळकर, अक्षय काकडे, रामहरी काकडे, धनंजय नाईकनवरे, कल्याण भोसले, विश्वनाथ नाईकनवरे तसेच साबला येथील नागरिकांनी या ग्राम स्वच्छता अभियानात सहभाग घेऊन साबला येथे ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले आहे.



