सामाजिक

यशवंतराव चव्हाणांचे नेतृत्व,सयाजीराव गायकवाडांचे दातृत्व, संभाजीराजेंचे बलिदान, सावित्रीबाईंचे कर्तृत्वाला इतिहासात तोड नाही – डाँ.वसुदेव बप्पा गायकवाड

केज/ प्रतिनिधी

स्वानंद सार्वजनिक वाचनालय,आनंदगांव ता.केज जि.बीड येथे दि. १२ मार्च २०२६ रोजी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष,जेष्ठ विचारवंत, जेष्ठ समाज सेवक,महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते, परखड व्याख्याते,प्राचार्य,डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड हे होते.प्रमुख व्याख्याते म्हणून दादासाहेब गायकवाड,एस.के. वैरागे यांची व्याख्याने झाली. प्रमुख पाहुणे म्हणून व्यंकटी घोगले, ज्ञानेश्वरी पुंड,कल्याणी भोगजकर यांची उपस्थिती होती. ग्रंथप्रदर्शनाला अनुजा घोगले,वेदिका गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी वाचक यांची उपस्थिती होती.

दि.११ मार्च २०२६ रोजी छत्रपती संभाजीराजे बलिदान दिन,महाराजा सयाजीराव गायकवाड जयंती व्याख्यान व ग्रंथ प्रदर्शनाने साजरी करण्यात आली.अध्यक्ष स्थानी डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड हे होते. यावेळी एम.आय.टी. पुणेचे गोविंद गायकवाड, संजय सोनवणे यांची व्याख्याने झाली. कार्यक्रमाला व ग्रंथ प्रदर्शनाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच रामराजे गायकवाड, नारायणभाऊ गायकवाड, बाबासाहेब वैरागे,मंचक वैरागे,एस. के.वैरागे,बालासाहेब गायकवाड,वेदिका गायकवाड,संजय सोनवणे यांची उपस्थिती होती.

दिनांक १० मार्च २०२६ रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती व्याख्यान व ग्रंथप्रदर्शन घेवून साजरी करण्यात आली.यावेळी छोटेखानी वेदिका गायकवाड,नारायणभाऊ गायकवाड,सुभाष गायकवाड यांची थोडक्यात व्याख्याने झाली.व्याख्यान व ग्रंथप्रदर्शन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून एम. आय.टी.पुणेचे गोविंद गायकवाड,माजी सरपंच रामराजे गायकवाड, बाबासाहेब वैरागे,शौर्य गायकवाड,शिवम गायकवाड,राजविर गायकवाड,वेदिका गायकवाड,आनंद भैय्या गायकवाड,ज्ञानेश्वर गायकवाड,ज्ञानेश्वरी पुंड, श्रुती पुंड,अनुजा घोगले, मधुरा तट,कल्याणी भोगजकर यांची उपस्थिती होती.अध्यक्षस्थानी डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड हे होते.

विविध कार्यक्रमादरम्यान अध्यक्षीय समारोप करताना यशवंतराव चव्हाणांच्या नेतृत्वाला, महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या दातृत्वाला,छत्रपती संभाजीराजे यांच्या बलिदानाला,सावित्रीबाई फुले यांच्या कर्तृत्वाला इतिहासात तोड नाही असे प्रतिपादन अध्यक्षीय समारोप प्रसंगी डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड यांनी केले.वेगवेगळया दिवशी आयोजित सर्व कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन ग्रंथालयाचे आनंद भैय्या गायकवाड यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!