
केज/प्रतिनिधी
नेकनूर येथील प्रमिलादेवी पाटील कला व विज्ञान महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.विक्रम सोनाजी ईनकर यांना राज्यशास्त्र विषयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
श्री.इनकर यांनी राज्यशास्त्र विषयात”महाराष्ट्रातील जातीय हिंसाचार एक -चिकित्सक अभ्यास” या विषयावर संशोधन कार्य पूर्ण केले.संशोधन मार्गदर्शक डॉ.सुनील पिंपळे यांच्या मार्गदर्शना खाली संशोधन कार्य पूर्ण केले.या यशाबद्दल संस्थापक सचिव खा. रजनीताई अशोकराव पाटील,सचिव आदित्य पाटील,प्राचार्य डॉ.ढास सर यांच्यासह शिक्षण क्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे.



