वैद्यकीयसामाजिक

कुंबेफळ येथे महिलांच्या आरोग्य तपासणीने भरपावसात स्वस्थ नारी सशक्त परिवार मोहीम यशस्वी

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील कुंबेफळ येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत ग्राम पंचायत कार्यालय कुंबेफळ व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्र उत्सवानिमित्त कुंबेफळ गावातील महिलांच्या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरात महिलांनी मोठ्या संख्येने आरोग्य तपासणी करून घेतली स्वस्थ नारी सशक्त परिवार ही मोहीम यशस्वी झाली.

या शिबिरामध्ये स्त्री रोग तज्ञ डॉ.योगेश्वरी थोरात व युसूफवडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.सुमित्रा नागरे यांनी महिलांची आरोग्य तपासणी करत महिलांना मार्गदर्शन केले. महिलांचे आरोग्य म्हणजे स्त्रियांच्या संपूर्ण शारीरिक, मानसिक आणि भावनिक कल्याणाचा विचार करणे होय,ज्यामध्ये मासिक पाळी,गर्भ धारणा,रजोनिवृत्ती आणि स्त्रीरोगविषयक समस्या तसेच हृदयरोग आणि मधुमेह या सारख्या महिलांमध्ये भिन्न पद्धतीने परिणाम करणाऱ्या आजारांचा समावेश होतो.

महिलांच्या आरोग्या साठी योग्य आहारा बरोबरच नियमित व्यायाम आणि वार्षिक आरोग्य तपासण्या महत्त्वाच्या आहेत व सद्यस्थिती मध्ये घर सांभाळत सांभाळत महिला भगिनी आपले लहान मोठे आजार हे अंगावरच काढताना दिसून येत आहे.परंतु कालांतराने हे आजार शरीरावर विपरीत परिणाम करतात म्हणून महिलांनी वेळीच आपली नियमित तपासणी करणे गरजेचे आहे असे केज येथील स्त्रीरोगतज्ञ डॉ.योगेश्वरी थोरात यांनी व्यक्त केले.

शिबिरात किशोरवयीन मुलींच्या व महिलांच्या हिमोग्लोबिन, थायरॉईड , मधुमेह , रक्तदाब इत्यादी तपासण्या करण्यात आल्या . शिबिर यशस्वी करण्यासाठी कुंबेफळ गावचे सरपंच व त्यांची टिम आणि प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी,आरोग्य सेवक,प्रयोगशाळा तंत्रज्ञ,आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविका व ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!