5 सप्टेंबर रोजी दैनिक समर्थ राजयोगच्या उत्कृष्ट प्रतिनिधींना पुरस्काराचे वितरण,
शेख आयेशा,सुनील शिरसाट,चंद्रकांत पाटील,शेख अब्दुल, अमोल कापसे,शंकर झाडे आणि शेख फारूक पहिल्या पुरस्काराचे मानकरी

बीड/प्रतिनिधी
दैनिक समर्थ राजयोग च्या सहाव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून शुक्रवार दिनांक 5 सप्टेंबर 2025 रोजी मान्यवरांच्या शुभहस्ते दैनिक समर्थ राजयोग मध्ये मागील कालावधी मध्ये उत्कृष्टरित्या काम करणाऱ्या मान्यवर प्रतिनिधींचे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर उत्कृष्ट प्रतिनिधी 2025 या सन्मानाच्या पुरस्काराने उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार असल्याचे संपादक वैभव स्वामी यांनी जाहीर केले आहे.
दैनिक समर्थ राजयोग चा वर्धापन दिन प्रति वर्षी विविध क्षेत्रातील शिक्षकांना राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार देऊन साजरा केला जातो.या उपक्रमामध्ये यावर्षी पहिल्यांदाच दैनिक समर्थ राजयोग मध्ये समर्थपणे समर्पित होऊन काम करणाऱ्या प्रतिनिधींना आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर उत्कृष्ट प्रतिनिधी 2025 या सन्मानाच्या पुरस्काराने मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात येणार आहे.
यावर्षी पहिल्या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत दैनिक समर्थ राजयोगच्या कार्यकारी संपादिका शेख आयेशा रफिक तसेच अंबाजोगाई येथील उपसंपादक सुनील शिरसाट,बीड येथील उपसंपादक शेख अब्दुल,केजचे तालुका प्रतिनिधी चंद्रकांत पाटील, गेवराईचे तालुका प्रतिनिधी अमोल कापसे,वडवणीचे तालुका प्रतिनिधी शंकर झाडे,आणि जालना जिल्ह्याचे जिल्हा प्रतिनिधी शेख फारूक हे सहा प्रतिनिधी यावर्षी पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. त्यांना 5 सप्टेंबर रोजी शाल , श्रीफळ, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात येणार असल्याचे संपादक वैभव स्वामी यांनी जाहीर केले आहे. निवड केलेल्या प्रतिनिधींचे सर्व स्तरा तून अभिनंदन होत आहे.



