१३ फेब्रुवारी रोजी केज येथे शिवसेनेचा विधान सभा मतदारसंघातील कार्यकर्ता संवाद मेळावा व पक्ष प्रवेश सोहळ्याचे आयोजन,सामाजिक न्याय मंत्री ना.श्री.संजय शिरसाट,संपर्कप्रमुख मनोज शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम

केज/प्रतिनिधी
केज विधानसभा मतदार संघात आगामी राजकीय हालचालींच्या पार्श्वभूमी वर शिवसेनेने शक्ति प्रदर्शनाची जोरदार तयारी सुरू केली असून,माजी आमदार प्रा.सौ. संगीताताई ठोंबरे यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी शिवसेना उपनेते पद दिले त्यानुसार शिवसेनेचा संगठन मजबूत करण्या साठी केज विधानसभा मेळावा शुक्रवार दिनांक १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता केज येथील मुक्ताई मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे.

शिवसेनेच्या उपनेत्या व माजी आमदार प्रा.सौ. संगीताताई ठोंबरे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.सचिन भैया मुळूक, शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.अनिल दादा जगताप, शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.स्वप्निल भैया गलधर यांच्या नेतृत्वाखाली मेळावा यशस्वी करण्या साठी नियोजन सुरू आहे केज विधानसभा मतदार संघातील माजी आमदार प्रा.सौ. संगीताताई ठोंबरे उपनेत्या शिवसेना यांच्या नेतृत्वाखाली केज विधान सभा मतदारसंघातील प्रत्येक गावात शिवसेनेची शाखा आणि शिवसेनेचा धनुष्यबाण प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवण्यासाठी शिवसैनिकांची धडपड चालू आहे.मागील अनेक वर्षापासून शिवसैनिक केज विधानसभा मतदार संघात शिवसेनेचा भगवा फडकवावा यासाठी प्रयत्नशील असतात.

माजी आमदार प्रा.सौ. संगीताताई ठोंबरे यांच्या शिवसेना पक्षप्रवेशामुळे शिवसेनेला नक्कीच चांगले दिवस येतील तसेच शिवसेनेला खंबीर नेतृत्व लाभले आहे केज विधानसभा मतदार संघातील जिल्हा परिषद पंचायत समिती तसेच जिल्हा भरातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दिनांक १३ फेब्रुवारी रोजी सामाजिक न्याय मंत्री श्री.संजयजी शिरसाट यांच्या प्रमुख मार्गदर्शना खाली तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.सचिन भैया मुळूक शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.अनिल दादा जगताप, शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.स्वप्निल भैया गलधर, केज विधानसभा प्रमुख श्री.दादासाहेब ससाने शिवसेना केज तालुका प्रमुख श्री.अण्णासाहेब पाटील,युवासेना तालुका प्रमुख श्री.दत्तकुमार काकडे यांच्या उपस्थितीत शिवसैनिकांच्या महा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रसंगी मतदारसंघातील तसेच जिल्ह्यातील अनेकांचे प्रवेश देखील होणार आहेत हा कार्यक्रम मुक्ताई मंगल कार्यालय जय भवानी चौक केज या ठिकाणी होणार असून सर्व शिवसैनिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेनेच्या उपनेत्या प्रा. सौ.संगीताताई ठोंबरे यांनी केले आहे.
संघटनात्मक बांधणी, कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आणि आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमी वर पक्षाची स्पष्ट भूमिका मांडण्यासाठी हा मेळावा महत्त्वाचा मानला जात आहे.या मेळाव्यास सामाजिक न्याय मंत्री श्री.संजय शिरसाट साहेब आणि संपर्कप्रमुख श्री. मनोज शिंदे साहेब उपस्थित राहून शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत.
केज विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद पुन्हा एकदा एकत्र आणण्यासाठी माजी आमदार प्रा.सौ. संगीताताई ठोंबरे व शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन भैया मुळुक, शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल दादा जगताप यांनी आखलेली ही रणनिती आगामी राजकारणाच्या दृष्टीने निर्णायक ठरणार आहे. मेळाव्यास केज विधान सभा मतदारसंघातील सर्व शिवसेना पदाधिकारी , आजी माझी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पक्षाची ताकद दाखवावी, असे आवाहन उपनेत्या व माजी आमदार प्रा.सौ. संगीताताई ठोंबरे यांनी केले आहे.



