महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई,शाखा केज च्या वतीने त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेधार्थ तहसील कार्यालय व पोलीस स्टेशन यांना निवेदन सादर


केज/प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारावर स्वामी समर्थ केंद्राजवळील पार्किंगवर दगडफेक, लाथाबुक्के यांचा वापर करून भयंकर मारहाण करण्यात आली.या झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज च्या वतीने तहसील कार्यालय व पोलीस स्टेशन यांना निवेदन सादर करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई,संजय भोकरे संघटक, विश्वास आरोटे सरचिटणीस,गोविंद वाकडे. प्रदेशाध्यक्ष, वैभव स्वामी प्रदेश संपर्कप्रमुख यांच्या प्रमुख मार्गदर्शना खाली महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई,शाखा केज च्या वतीने निवेदन देण्यात आले.
वार्तांकनासाठी गेलेल्या त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी जीवघेणा हल्ला केला. झी २४ तासचे ब्युरो चीफ श्री.योगेश खरे, साम टीव्हीचे ब्युरो चीफ श्री.अभिजित सोनवणे व पुढारी न्यूजचे ब्युरो चीफ श्री.किरण ताजने यांच्यावर स्वामी समर्थ. केंद्राजवळील पार्किंग वर दगडफेक, लाथाबुक्के यांचा वापर करून भयंकर मारहाण करण्यात आली.
राज्यात पत्रकारांवर वारंवार होणारे हल्ले ही लोकशाहीला काळिमा फासणारी बाब असून चौथ्या स्तंभावर घाला घालणारी धोकादायक प्रवृत्ती आहे.पत्रकार सत्य घटनांचा आवाज बनून अन्याय, भ्रष्टाचार व सामाजिक प्रश्न प्रकाशात आणण्या साठी अहोरात्र परिश्रम घेतात.अशा लोकांवर होणारे हल्ले ही असह्य व निंदनीय बाब आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ सर्व हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी, पत्रकारांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना राबवाव्यात तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस व प्रभावी धोरण आखावे.
यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केजचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत पाटील,उपाध्यक्ष प्रदीप गायकवाड,सचिव विजय बिक्कड, कार्याध्यक्ष नंदकिशोर मिसाळ,प्रसिद्धीप्रमुख पांडुरंग कसबे,पत्रकार हल्ला विरोधी समितीचे अध्यक्ष विश्वास राऊत, पत्रकार हिराचंद काळे, उपस्थित होते.



