सामाजिक

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज यांच्या वतीने नगराध्यक्षा डॉ.सौ. सिताताई बनसोड यांचा 55 व्या वाढदिवसा निमित्त सत्कार संपन्न 

केज/प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज च्या वतीने केजच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा डॉ.सौ. सिताताई बनसोड यांचा 55 वा वाढदिवस दि.20 सप्टेंबर 2025 वार शनिवार रोजी शासकीय विश्रामगृह केज येथे सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या बाबत सविस्तर वृत्त असे की,राष्ट्रवादीकाँग्रेस पार्टीच्या(अजित पवार गट)धडाडीच्या कार्यकर्त्या केज शहराच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या, कार्यशील नगराध्यक्षा डॉ.सौ.सीताताई बनसोड यांचा वाढदिवस शाल,श्रीफळ हार,पुष्पगुच्छ देऊन त्यांना भावी वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या.

वाढदिवसा निमित्त गाण्यांची मैफिल रंगली बार बार दिन ये आये या गाण्याने सर्वांना मंत्रमुग्ध केले. गायकांनी प्रेक्षकांची मने जिंकली.अनेक वक्त्यांनी शुभेच्छा पर भाषण केले व शुभेच्छा दिल्या.डॉ‌.सौ.सिताताई बनसोड अनेक वर्षा पासून समाजकारण व राजकारण सतत अग्रेसर आहेत. जनतेची कामे करण्यात सतत उत्साही असतात लोकांविषयी आपुलकी घेऊन त्या सातत्याने काम करीत आहेत. केज शहरातील कोणत्याही अडचणीतल्या व्यक्तीला मदत करण्याची त्यांची भूमिका असते.

चढउतार आले तरी शहरांमध्ये आपले असणारे योगदान देऊन पुढे चालण्याचा त्यांचा प्रयत्न चालूच असतो. केज शहर व शहराच्या विकासासाठीआवश्यक असणाऱ्या गोष्टीसाठी त्या आग्रही राहतात. केज शहरात विकासाचे काम चालू असताना सुद्धा सार्वजनिक आणि वैयक्तिक स्वरूपाचे प्रश्न सोडविण्यासाठी त्या सातत्याने कार्यरत आहेत.55 वर्षे पूर्ण झाले तरी कामाचा तोच उत्साह आहे.केज शहरासाठी असेच योगदान त्यांनी पुढच्या काळातही द्यावे अशा प्रकारची सदिच्छा मिळावी व चांगल्या कामाची प्रशंसा व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केजच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांचे आयुष्य सुख समृद्धीचे जावे.त्यांना दीर्घायुष्य लाभावे त्यांच्या कडून या परिसरातीलसर्वसामान्य जनतेची व शहराची सेवा घडावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे केज तालुकाध्यक्ष चंद्रकांत पाटील,उपाध्यक्ष प्रदीप गायकवाड, सचिव विजय बिक्कड, कार्याध्यक्ष नंदकिशोर मिसाळ, प्रसिद्धी प्रमुख पांडुरंग कसबे ,डिजिटल मीडियाचे तालुकाध्यक्ष विश्वास राऊत ,पत्रकार अनिल वैरागे ,पत्रकार दत्ता मुजमुले आदी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!