कृषीसामाजिक

किंमतीपेक्षा जास्त दराने युरिया खताची विक्री करणाऱ्या विक्रेत्यावर तात्काळ कारवाई करा – प्रा.बबनराव आंधळे

बीड/प्रतिनिधी

बीड जिल्ह्यातील शेतकरी अतिवृष्टीने होरपळून निघाला आहे यावर्षी कापूस व सोयाबीन काढून ज्वारी,बाजरी,गहू भुईमूग पीक घेऊन कुठेतरी आशेचा किरण पाहत असताना व्यापारी व कृषी सेवा केंद्र चालक युरियाचा साठा करून कृत्रिम तुटवडा निर्माण करत आहेत तसेच जास्त दराने युरिया खताची विक्री करत असल्याचे दिसून येत आहे.

या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी ग्रामीण युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक बबनराव आंधळे यांनी केली आहे युरिया खताची साठेबाजी करून शेतकऱ्यांना २६६ रुपये किमतीचा युरिया ४०० ते ५०० रुपये किमतीने विकला जात आहे हे दुर्दैव आहे.खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण करणाऱ्या व जास्त भावाने युरिया खताची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी या मागणी करिता ग्रामीण युवक संघटना आता रस्त्यावर आलेली आहे.

किंमतीपेक्षा जास्त भावाने विक्री करणाऱ्या व्यापारी व कृषी सेवा केंद्र चालक यांना आपल्याकडील युरियाचा साठा किती आहे याचा माहिती फलक लावणे बंधनकारक करावे शेतकऱ्यांची आडवणूक करून जास्त दराने युरिया खताची विक्री करणाऱ्यांचा परवाना तात्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी ग्रामीण युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. बबनराव आंधळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे नसता संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये ग्रामीण युवक संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!