स्वातंत्र्य सैनिक तथा शिक्षक शंकरराव काळेगावकर अनंतात विलीन

केज/प्रतिनिधी
स्वातंत्र्य सैनिक तथा जिल्हा परिषदेचे शिक्षक मराठवाडा मुक्तीसंग्रामचे सैनिक श्री.शंकरराव काळेगावकर यांचे वयाच्या ९७ व्या वर्षी दुःखद निधन झाले. शंकरराव काळेगावकर हे अतिशय शिस्तप्रिय व स्वावलंबी असे करारी बाण्याचे व्यक्तिमत्त्व होते भारतीय सैन्य दलातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेत शिक्षक म्हणून कार्य केले हे जिल्हा परिषदेच्या अनेक पिढ्या त्यांनी घडवल्या हैदराबाद मुक्ती संग्रामात सुद्धा त्यांचे योगदान होते विविध शासकीय कर्मचारी तथा राजकीय पदाधिकारी यांचे शिक्षण त्यांच्या हातात घडवले दिनांक १६ मार्च रोजी पहाटे ३-४५ वाजण्याच्या दरम्यान त्यांचे दुःखद निधन झाले.
सायंकाळी ५-०० क्रांतीनगर केज या ठिकाणी अंत्यविधी पार पडला.यावेळी स्वातंत्र्य सैनिक म्हणून केज तहसीलच्या वतीने मंडळ अधिकारी भालेकर यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली तसेच त्यांचा विद्यार्थी वर्ग अंत्यसंस्काराला उपस्थित होता.माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवेंद्र शेटे,निवृत्त पीएसआय शिंदे,निवृत्त सीआरपीएफचे लोंढे, स्वामी विवेकानंद विद्यालयाचे सचिव जी.बी.गदळे सर,शेषेराव कसबे,प्रशांत देशपांडे, सुनील देशपांडे,भारतीय जनता मजदूर संघाचे महाराष्ट्र सचिव धनंजय कुलकर्णी यांच्यासह नातेवाईक,आप्तस्वकीय विद्यार्थी जनसमुदाय उपस्थित होता.त्यांच्या पश्चात एक मुलगा,तीन मुली,नातवंड आदी परिवार आहे.



