सामाजिकसांस्कृतीक

विजयादशमी,महात्मा गांधी,लालबहादूर शास्त्री हि देशाची विजयी प्रतिके -डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड

केज/प्रतिनिधी

स्वानंद सार्वजनिक वाचनालय,आनंदगांव ता.केज जि.बीड येथे दि.2आक्टोंबर 2025 रोजी विजयादशमी, महात्मा गांधी जयंती, लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने व्याख्यान,परिसंवाद इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रम घेवून साजरे करण्यात आले.

विजयादशमी,महात्मा गांधी,लालबहादूरशास्त्री हे देशाच्या विजयाची प्रतिके असल्याचे प्रतिपादन व्याख्यान समयी व्याख्याते,जेष्ठ विचारवंत,जेष्ठ समाज सेवक डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड यांनी केले.

या व्याख्यानात त्यांनी विजयादशमी,महात्मा गांधी,लालबहादूर शास्त्री इत्यादी विषयी सविस्तर विवेचन केले. हि महान व समृद्ध प्रतिके आपण जपली पाहिजेत असे प्रतिपादन डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच रामराजे गायकवाड हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून रावसाहेब जाधव, एस. पी. गायकवाड सेवानिवृत्त ग्रामसेवक, आरुण गायकवाड, एस. के.वैरागे यांची उपस्थितीहोती.त्यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.त्यानंतर याच विषयावर परिसंवाद घेण्यात आला.या परिसंवाद कार्यक्रमात रविंद्र गायकवाड, आण्णासाहेब भोगजकर, रावसाहेब गायकवाड, सुखदेव गायकवाड, बबन पुंड,संजय सोनवणे यांनी सहभागी होऊन मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष, जेष्ठ विचारवंत,जेष्ठ समाज सेवक,ख्यातनाम वक्ते व परखड व्याख्याते डॉ. वसुदेवबप्पा गायकवाड हे होते.सर्व कार्यक्रमाचे प्रास्ताविक,सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन ग्रंथालयाचे आनंद भैय्या गायकवाड यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!