शैक्षणिकसामाजिक

साने गुरुजी निवासी विद्यालय केजच्या विद्यार्थ्यांनी दिला स्वच्छतेचा संदेश 

केज/प्रतिनिधी

नगरपंचायत कार्यालय केज अंतर्गत केज शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात येत असुन या स्वच्छता अभियानात येथील साने गुरुजी निवासी विद्यालय केज च्या विद्यार्थ्यांनी धारुर रोड ते भवानी चौक या स्वच्छ शहर सुंदर शहर यासाठी या शाळेतील स्काऊट गाईड व विको क्लब व शाळकरी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात भवानी चौकची साफसफाई करून परिसरातील केर कचरा साफ करुन जनतेची मने जिंकली व या भर चौकात स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी अतिशय सुंदर व उत्कृष्ट असे स्वच्छतेवर आधारित पथनाट्य सादर करून स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले.

या प्रसंगी उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात पथनाट्याला प्रतिसाद दिलाहे पथनाट्य व स्वच्छता अभियानात संकुलाच्या प्राचार्या डॉ.कविता कराड मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आला या प्रसंगी केज नगर पंचायतच्या नगराध्यक्षा सौ.सिताताई बनसोड, गटनेते हारुणभाई इनामदार,सोनकांबळे व इतर नगर पंचायतचे नगरसेवक व कर्मचारी उपस्थित होते तसेच शाळेतील कर्मचारी गुजर नागनाथ,कल्पना जोशी, मजहर शेख,इंद्रमोहन कराड यांनी ही विद्यार्थ्यां सोबत या स्वच्छता मोहीमेत सहभाग नोंदविला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!