सामाजिक

दादाराव चौरे यांचे वृद्धापकाळाने दुखःद निधन,जिवाचीवाडी तील शतायुषी व्यक्तिमत्त्व हरपले

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील जिवाचीवाडी येथील ज्येष्ठ व शतायुषी व्यक्तिमत्त्व स्व.दादाराव नामदेव चौरे वय १०५ वर्षे यांचे वृद्धापकाळाने मंगळवार दि.२ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता दुःखद निधन झाले.त्यांच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

स्व.दादाराव चौरे हे अत्यंत कष्टाळू, मनमिळावू व थोर व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात. शेतकरी कुटुंबात जन्मलेले दादाराव यांनी आयुष्यभर शेतीवर प्रेम केले. दीर्घायुष्य लाभलेल्या चौरे यांनी आपल्या कर्तृत्वातून कुटुंबासोबत समाजात ही एक आदर्श निर्माण केला होता.त्यांच्या निधनाने जीवाचीवाडी व परिसरात शोककळा पसरली आहे.वयोवृद्ध असूनही त्यांची साधी, सरळ जीवनशैली व लोकांशी वागणारा जिव्हाळा यामुळे त्यांचा मोठा स्नेही वर्ग तयार झाला होता.

त्यांच्यावर अंत्यसंस्कार बुधवारी दि.३ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता त्यांच्या शेतात, काळांबा येथे होणार आहे.त्यांच्या पश्चात तीन मुले,एक मुलगी, सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे. कुटुंबातील ज्येष्ठ आधारस्तंभ हरपल्याने परिसरात शोक व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!