जिवाची वाडी येथील शिक्षक हनुमंत चौरे यांची बदली झाल्यामुळे निरोप समारंभ संपन्न

केज/प्रतिनिधी
दि.१८ सप्टेंबर रोजी केज तालुक्यातील जीवाचीवाडी येथील जि.प.प्रा.शाळा एडका वस्ती या शाळेतून हनुमंत चौरे यांची बदली झाली असून त्यांनी दि.1 जुलै 2004 ते दि.18 सप्टेंबर 2025 पर्यंत म्हणजे २०-२१ वर्ष या जिल्हा परिषद शाळा एडका वस्ती येथे शैक्षणिक कार्य केले.
त्यांनी गावातील एक नागरिक सोडून शिक्षक कसा असावा हे त्यांच्या शिक्षक वृतीतून अनेक वेळी गावकऱ्यांनी अनूभवले आहे.असे शिक्षक प्रत्येक शाळेवर असावेत म्हणजे शिक्षण क्षेत्रातील दर्जा उंचावेल आणि विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात आवड निर्माण होईल व विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यासाठी योग्य पाया उभारलेला दिसेल हनुमंत चौरे सर यांच्या निरोप समारंभ नाही तर दु:ख म्हणावे लागेल.
कारण शिक्षक काय असतो हे त्यांनी विद्यार्थ्यांना नाही तर तेथील नागरीकांना देखिल त्याची जाणीव करून दिली.आज आम्ही चांगल्या शिक्षकाला निरोप देतोय हे दु:ख आहे पण त्यांनी केलेली कामगिरी हि अतुलनीय आहे.हनुमंत चौरे सर यांनी मुलांना दिलेली शिक्षण रुपी विद्या त्याबद्दल आम्ही तुमचे ऋणी आहोत. आपले कार्य सदैव विस्मरणीय राहील असे भावनीक उद्गार एडका वस्ती वरील पालकांनी यावेळी व्यक्त केले.



