बीड जिल्ह्यातील भुमीपुत्र भाऊसाहेब घोडके यांचीभारतीय जनता मजूर संघाच्या राष्ट्रीय सचिव पदावर नियुक्ती,सर्व स्तरातून होतोय अभिनंदनाचा वर्षाव

बीड/प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील आमला गावचे भुमी पुत्र सध्या दिंद्रुड येथे वास्तव्यास असलेले भाऊसाहेब घोडके यांची भारतीय जनता मजूर संघ (औद्योगिक) या देशभर कार्यरत असलेल्या प्रतिष्ठित संघटनेने संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणा साठी उल्लेखनीय योगदान देणारे भाऊसाहेब लक्ष्मण घोडके अमला ता.धारूर, जि.बीड) यांची राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती केली आहे.
या नियुक्तीची घोषणा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शांतप्रकाश जाटव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, नियुक्तीपत्रावर अॕड. रक्षपाल सिंह,राष्ट्रीय सरचिटणीस,भारतीय जनता मजूर संघ यांनी केली आहे.भाऊसाहेब घोडके हे संघटनेचे निष्ठावान कार्यकर्ते असून, ग्रामीण भागातील कामगार व शेतकरी वर्गाच्या समस्यांवर सातत्याने कार्यरत आहेत. सामाजिक बांधिलकी आणि संघटनात्मक कौशल्य यामुळे त्यांनी संघटनेत विशेष स्थान निर्माण केले आहे.
नवीन जबाबदारी मिळाल्यानंतर भाऊसाहेब घोडके यांनी सांगितले की, “ही माझ्यासाठी अभिमानाची व जबाबदारीची वेळ आहे. संघटनेच्या उद्दिष्टांसाठी आणि कामगारांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी मी पूर्ण निष्ठेने कार्य करीन.”संघटनेच्या वर्तुळात त्यांच्या नियुक्तीचे स्वागत करण्यात आले असून,कार्यकर्त्यांनी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.



