कोथरूड मध्ये गुण गौरव पुरस्कार समारंभ उत्साहात संपन्न,प्रियंका गुरव ला विशेष सन्मान

पुणे/प्रतिनिधी
भारती विद्यापीठ,पुणे तसेच अभिजीत दादा कदम मित्र मंडळ व प्रतिष्ठान ट्रस्ट ,कोथरूड, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गुणगौरव पुरस्कार समारंभ दि.२ऑक्टोबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. विविध क्षेत्रांत उल्लेख नीय यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा व व्यक्तींचा या समारंभात सत्कार करण्यात आला.यावेळी विशेष पुरस्कार म्हणून चित्रकला क्षेत्रात व शैक्षणिक गुणवत्तेत सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कु. प्रियंका चंद्रहंस गुरव हिला उत्कृष्ट गुणगौरव विद्यार्थिनी म्हणून गौरविण्यात आले.
तिच्या यशाची दखल घेऊन तिला सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्षपद अॅड.श्री. रामचंद्र कदम(चंदूशेठ), नगरसेवक,पुणे महा नगरपालिका यांनी भूषविले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. काकासाहेब जाधव, डॉ.सुहास मोहिते,प्रा. सागर खळतकर,प्रा. सुनील पवार,श्री.सागर सुबराव कदम तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.समारंभाच्या प्रारंभी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा पुरस्कारांनी प्रोत्साहन मिळते, से मत प्रमुख पाहुण्यांनी व्यक्त केले. यावेळी विद्यार्थ्यांनी व पालकांनीही उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. समारंभाचे सूत्रसंचालन संस्थेच्या पदाधिकारी यांनी तर आभारप्रदर्शन अभिजीत दादा कदम मित्र मंडळ व प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले.



