निवडणूक

पाली व येळंब घाट गणातील तांदळ्याचीवाडी येथे कॉर्नर बैठक संपन्न, बप्पासाहेब घुगे यांनी गावकऱ्यांशी साधला संवाद

बीड/प्रतिनिधी

पाली जिल्हा परिषद सर्कल आणि येळंब घाट पंचायत समिती गणातील तांदळ्याचीवाडी येथे आयोजित करण्यात आलेली कॉर्नर बैठक मोठ्या उत्साहात व उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीत स्थानिक प्रश्न, विकासकामे,शैक्षणिक व आरोग्यविषयक गरजा तसेच मूलभूत सुविधां बाबत सविस्तर चर्चा झाली.

बैठकी दरम्यान बप्पासाहेब घुगे यांनी गावकऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी, अपेक्षा आणि प्रलंबित मागण्या जाणून घेतल्या. गावकऱ्यांनी रस्ते,पाणी पुरवठा,वीजपुरवठा,शेती संबंधी समस्यांबाबत मोकळेपणाने मते मांडली घुगे यांनी या सर्व प्रश्नांवर सकारात्मक प्रतिसाद देत स्थानिक विकासाला प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले.तांदळ्याच्यावाडी तील नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती पाहून विकासाची इच्छाशक्ती अधिक दृढ झाल्याचे बप्पासाहेब घुगे यांनी सांगितले. “लोकांच्या विश्वासाला उतरून त्यांच्यासाठी काम करणे हीच माझी प्राथमिकता आहे,” असेही ते म्हणाले.

कॉर्नर बैठकीमुळे गावकऱ्यांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण झाल्याचे दिसून आले असून येळंब घाट परिसरातील विकासा साठी या संवादातून सकारात्मक दिशा मिळाल्याची भावना लोकांतून व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!