सामाजिक

साखरपुढ्याला आले अन मंगल परिणय लावुन गेले माजलगाव शहरातील घटना 

माजलगाव/प्रतिनिधी

माजलगाव शहरातील जयभीमनगर येथे जाधव व कांबळे परिवाराने एक आदर्श मंगल परीणय करताना लग्नाचा खर्चाला फाटा देऊन साखर पुड्यात लग्न लावुन समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, माजलगाव येथील झुंबरराव जाधव माजी वाहातुक नियंत्रक रा. तालखेड ता.माजलगाव जि.बीड ह.मु.जयभीम नगर माजलगांव व भारतभूषण कांबळे रा. रोषनपुरी ता.माजलगाव जि.बीड या दोन्ही परीवाराच्या साक्षगंधा मध्ये-खर्चाला फाटा देत मंगल परिणय सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला या मध्ये,दयानंद स्वामी, विजय साळवे,कचरू तात्या खळगे , धम्मानंद साळवे, अशोक पौळ, अमोल डोंगरे,किसन भदर्गे, राजाभाऊ पोटभरे,रूपचंदकांबळे, जयराम कांबळे,तात्या कांबळे,रमेश वाल्मिकी, कैलास वाल्मिकी, जयभीम नगर मधील भिकू कांबळे,नंदु कांबळे,विशाल टाकणखार,एम.के. प्रधान व इतर मान्यवराच्याउपस्थितीत संपन्न झाला.

बोधाचार्य म्हणून शाम वाघमारे यांनी विधी पार पाडला मुक्तिराम ताकट,मा. सरपंच गणेश नामदेव, महादेव ताकट, राजाभाऊ ताकट उपस्थीत होते.वंचित बहुजन आघाडीचे अंकुश जाधव,जयराम कांबळे यांनी या साखर पुड्यात मंगल परिणय लावण्यासाठी दोन्ही कुटुंबास मध्यस्थीची भूमिका घेतली या कार्यक्रमास उषाताई बनसोडे,दिपक टाकणखार,अविनाश बनसोडे,दिपक कसबे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी विकास मस्के यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!