सौ.शीतलताई दांगट यांच्या हळदी कुंकू कार्यक्रमास महिलांचा प्रचंड प्रतिसाद

केज/प्रतिनिधी
केज नगर पंचायतच्या उपनगराध्यक्षा सौ.शितल पशुपतीनाथ दांगट यांनी येथील मुक्ताई मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या प्रा. सुरेश साळुंखे यांचा होम मिनिस्टर स्मार्ट मिनिस्टर खेळ पैठणीचा क्षण आनंदाचा या कार्यक्रमाने खास महिलांसाठी मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदीहकुंकूचा कार्यक्रम घेण्यात आला .
या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आ.सौ.संगिताताई ठोंबरे सौ.अर्चनाताई आडसकर,सौ.रेवतीताई सोनवणे, प्रा. कविताताई कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला या कार्यक्रमास महिलांचा मोठ्या उपस्थित होत्या या हळदी कुंकू कार्यक्रमात महिला करिता खेळ पैठणीचा क्षण आनंदाचा हा स्पर्धात्मक खेळ घेण्यात आला यात विजयी होणा-या विजेत्यास प्रथम व्दितीय व तृतीय विजेत्या महिलांना पैठणी साडी बक्षीस म्हणून देण्यात आली.या कार्यक्रमास महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेऊन विविध बक्षीसाची लयलूट केली शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ.शितल पशुपतीनाथ दांगट यांनी मानले.



