स्वामी विवेकानंद विद्यामंदिर [मा.वि.] शाळेतील विद्यार्थ्यांचे विविध स्पर्धेमध्ये नेत्रदीपक यश

केज/प्रतिनिधी
जीवन विकास शिक्षण मंडळ केज संचलित, स्वामी विवेकानंद विद्यामंदिर [माध्यमिक विभाग] या शाळेतील विद्यार्थी नेहमीच विविध क्षेत्रांमध्ये नावलौकिक करतात. नुकत्याच पार पडलेल्याज्ञतालुका स्तरीय बुध्दीबळ स्पर्धा, जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धा, फ्रिस्टाइल स्पर्धा तसेच केज येथील गुंड गल्ली गणेश आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन व चित्रकला स्पर्धेमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.तेंव्हा या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा शैलाताई इंगळे मुख्याध्यापिका शिवनंदा मुळे तसेच सर्व शिक्षकवृंद यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
केज येथील स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल येथे तालुकास्तरीय बुध्दीबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे सचिव जी.बी.गदळे सर यांच्या हस्ते संपन्न झाले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शैलाताई इंगळे तर प्रमुखअतिथी रेखा यादव तालुका क्रीडा अधिकारी या उपस्थित होत्या.या स्पर्धेमध्ये १७ वर्ष वयोगटातून श्रेया विनोद गुंड तालुक्यातून सर्वप्रथम आली.तर समिधा विजय एखंडे ही १४ वर्ष वयोगटातून द्वितीय आली.
जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेमध्ये मयुरी मनोज राऊत १७ वर्ष वयोगट सिल्व्हर मेडल,मैथिली कैलास हावळे १७ वयोगट सिल्व्हर मेडल,अक्षदा अमर तांदळे १४ वर्ष वयोगट सिल्व्हर मेडल. तसेच तालुकास्तरीय फ्रीस्टाइल कुस्ती स्पर्धे मध्ये- १४ वर्ष वयोगटा तून ३८ वजन गटातून शेप सोहम रामराव हा तालुक्यातून सर्वप्रथम आला.तर पवन अशोक डापकर ६० वजन गटातून तालुक्यातून सर्वप्रथम आला.
केज येथील गुंड गल्ली गणेश मंडळातर्फे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये शिवम सुग्रीव बेडसकर याने प्रथम पारितोषिक पटकावले ५००१ रुपये रोख तर रोहित कैलास नेहरकर व कृष्णा ज्ञानेश्वर इंगळे यांनी द्वितीय पारितोषिक पटकावले २१०० रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप होते.तसेच तालुकास्तरीयचित्रकला स्पर्धेमध्ये हर्षदा उदय सिरसट ही विद्यार्थिनी सर्वप्रथम आली.तर प्रणिती प्रशांत कोकीळ ही द्वितीय आली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार दत्ता सत्वधर यांनी मानले.



