सामाजिक

शेगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग,खा.बजरंग सोनवणे यांनी संसदेत मांडला प्रश्न,केंद्रीय मंत्री गडकरींनी दिले उत्तर

बीड/प्रतिनिधी

शेगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग ५४८ सी मधील परतूर ते कळंब पर्यन्तचा मार्ग बीड जिल्ह्यातून जातो.या टप्प्यातील अपूर्ण कामे, जोड-रस्ते व अडथळ्या मुळे थांबलेली कामे रस्ता बांधकामाचा सुमार दर्जा व त्यामुळे नागरिकांना होणाऱ्या गैरसोयी व अपघात याबाबत खा.बजरंग सोनवणे यांनी संसदेत प्रश्न उपस्थित केला होता.रस्ते कामाचा सुमार दर्जा,तांत्रिक दोष आणि ठेकेदारांची मनमानी याबाबतही खा.बजरंग सोनवणे यांनी खंत व्यक्त केली. या प्रश्नाला केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी उत्तर दिले असून अपुर्ण कामे तातडीने पुर्ण करण्याचे तसेच कामाच्या दर्जा बाबतही आश्वासन दिले आहे.

रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी उत्तरात म्हटले आहे,शेगाव- पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग ५४८ सी यामहामार्गाचा एकूण ७२० किमीपैकी ७०८ किमीचा रस्ता पूर्ण झाला असून उर्वरित १२ किमीचे काम विविध टप्प्यांवर आहे.हे काम टप्प्या टप्प्याने २०२७-२८ पर्यन्त पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.परतूर- माजलगाव (किमी ५१-१०१) टप्पा २०१७ मध्ये सुरू होऊन दि.३१ जुलै २०१९ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र,विद्यमान महामार्ग प्राधिकरणाशी वाद, जमिनीचे अधिग्रहणा तील विलंब आणि अन्य पूर्वतयारीतील अडचणीं मुळे सहा वर्षे हे काम रखडलेआहे.माजलगाव तालुक्यातील सादोळा गावाजवळ ६०० मीटर रस्ता स्थानिक विरोधा मुळे अद्याप अपूर्ण आहे तो तातडीने पूर्ण करुन घेण्यात येईल.

माजलगाव-केज आणि केज-कळंब टप्प्यांसाठी ९३८.३५ कोटी रुपये मंजूर असून आतापर्यंत ६९० कोटी रुपये खर्च झाले आहेत.या टप्प्यातील उर्वरित काम डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.या महामार्गातील धारुर घाटातील पर्यायी मार्गाचे काम तसेच बर्दापूर-लोखंडी सावरगाव दुहेरीकरणाचे काम नियोजनानुसार वेळेत व मानकानुसार करुन घेण्यात येईल, असेही म्हटले आहे.

अपघातातील पीडितांना मदत

या अपूर्ण रस्त्यांवर वेगाने वाहन चालवणे, हेल्मेट न वापरणे यामुळे अपघात झाले आहेत.पिडितांना हिट अँड रन मोटार अपघात पीडित योजना २०२२ अंतर्गत भरपाई दिली जात आहे.सर्व प्रकल्पांची गुणवत्ता काटेकोर तपासली जाणार असून,मानका नुसार न झालेल्या कामांचे पुनर्निर्माण करण्याची जबाबदारी सरकारची आहे,असेही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उत्तरात म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!