सामाजिक

राजभवन येथे शिवस्मारक उभारणीची मागणी ; संभाजी ब्रिगेड चा इशारा

केज/प्रतिनिधी

विश्ववंद्य छत्रपतीशिवाजी महाराज यांचे भव्य शिवस्मारक राजभवन येथे उभारण्यात यावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडतर्फे करण्यात आली आहे.याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की,छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण जगासाठी प्रेरणास्थान असून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी भव्य स्मारक उभारणे आवश्यक आहे.यापूर्वी अरबी समुद्रात शिवस्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

त्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजनही करण्यात आले होते.मात्र हाप्रकल्प अद्याप पूर्णत्वास गेलेला नाही.संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, राजभवन परिसर हा निसर्गरम्य, प्रशस्त व पर्यटकांसाठी सहज उपलब्ध असल्याने स्मारकासाठी योग्य ठिकाण ठरू शकते. त्यामुळे शासनाने तात्काळ निर्णय घेऊन या ठिकाणी शिवस्मारक उभारणीस मंजुरी द्यावी.

दरम्यान,या मागणीवर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय न घेतल्यास संभाजी ब्रिगेडतर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.निवेदनावर राहुल खोडसे जिल्हा अध्यक्ष बीड, प्रवीण ठोंबरे विभागीय सचिव, रामकिसन मस्के, नूर शेख,बाळाजी यादव, लहूजी शिंदे, गजानन अंबाड (जिल्हा संघटक), आकाश नखाते (तालुकाध्यक्ष केज), अंकुश ढोबळे,चैतन्य शेप,भागवत खोडसे यांच्या सह्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!